Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 2.89: [16-4-1758] Purshottam Mahadeo Hingne writes to Raghunathrao about the negotiations that were being carried on with the Rohilla chiefs for joining Marathas against Abdali.

Selections from the Peshwa Daftar 2.89

Language
Marathi

2.89

श्री.

पै॥ छ १७ साबान.

श्रीमंत राजश्री दादासाहेब स्वामीचे शेवेसी.

विनंती सेवक पुरुषोत्तम महादेव कृतानेक सां। नमस्कार विज्ञाप्ति. येथील कुशल ता॥ छ ७ माहे साबान स्वामीचे कृपावलोकनेकरून यथास्थित असे विशेष. इकडील वर्तमान सविस्तर पूर्वी विनंती पत्रे सी। पाठविली आहेत. त्यावरून वृत्त श्रुत होईल. हली वर्तमान तरी सरकारचे खालिते घेऊन एकदोन प्रहस्त अहमदखानाकडे वगैरे रोहिल्याकडे आले. त्याणी कितीक प्रकार फिसाद पठाणाच्या चित्तात घातला कीं श्रीमंत दक्षगेस जातात म्हणून सांगितले. त्या गोष्टीस वजीरहि माहीत आहेत व सेवकासहि कळले आहे. वजीराही व सेवकाही आठ महिने बसून कामास नमुद केले आहे. जे ग्रहस्त फिसाद घालितात त्याच्या मते कीं याचे केले न होय ते करावे. ऐशास कितीका प्रकारच्या वलगणा केल्या आहेत. त्या सेवेसी आल्यावर तपसीलवार निवेदन केल्या जातील. साराउश की फौज घेऊन आलों. स्वामीही वजीरास भेटल्याखेरीज तेथून कूच करून आणखीकडे न जावे. छ ६ तारखेस अहमदखान वजीराचे येथे येऊन वजीरास व सेवकास रुखसत केले व जबानी सांगितले कीं श्रीमंताची मर्जी शहासीहि जुजावयाची असेल तर आम्ही तयार आहो. मग वरकडाचा मजकूर काय? ऐशी कितीक भाषणें स्नेहाची केली. तो विस्तार हजूर येऊन विनंती करूं व हेहि बोलिले कीं आम्ही सर्वांसी तोडून स्वामीचे जालों व स्वारी देशास जाणार म्हणून येथे कोणी सांगतात. तर हे गोष्ट न करावी ये प्रांतांचा बंदोबस्त केलियावर जैसी मर्जी असेल तैसे करणार स्वामी समर्थ आहेत. या प्रमाणे सांगितले. ते सो विनंती लिहिली असे. श्रुत होय. त्याउपरी आम्ही उत्तर दिधले कीं तुम्हास येथें लोक सांगतात कीं श्रीमंत दक्षिणेस जातात व श्रीमंतास कितीक अर्ज करितात की पठाण रोहिल्याच्या फौजा येत नाहींत. उगेच लाऊन ठेविले आहे. त्यास या गोष्टीवर मदार काय आहे. अतःपर सत्वर फौजा पाठऊन स्वामीचे मनास तुमचे सत्यवादीपण दृढतर होय ते करावे या प्रमाणें उत्तर दिधले. त्यानीहि मान्य केले. विस्तार हजूर येऊन श्रुत करूं. वजीरानी पत्रें सो पाठविली आहेत. उतरी सनाथ केले पो. व इटावाियापासीं नावांची परवाणगी रा॥ बाळाजी गोविंद यास पाठविली पाहिजे. इटावाियासी यांच्या नावा पांच सात आहेत. तेवढियानें फौज उतरावयासी दिरंग लागेल. फौज उतरोन नावा फिरोन आपले घाटावर घेऊन जाणे म्हणोन आज्ञापत्र सादर केले पो. कृपा करणार स्वामी समर्थ आहेत हे विज्ञप्ति.

[१ हरगीज = बिल्कुल]