Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 2.90: [12-6-1758?] Gopalrao Ganesh Barve writes this letter to one Nana who cannot be identified. It mentions that an agreement had been effected with Suja-ud-daula. To what period this agreement refers, it is difficult to ascertain. Further light requires to be thrown on this affair.

Selections from the Peshwa Daftar 2.90

Language
Marathi

2.90

श्री.

तीर्थस्वरूप राजश्री नानास्वामी वडिलांचे सेवेसी.

अपत्येसमान गोपाळराव गणेश कृतानेक साष्टांग नमस्कार विनंती उपरी. येथील कुशल ता॥ छ ५ सवाल मु॥ मौहेरा क्षेम असे विशेष.

[१ फरूकावादेच्या उत्तरेस.]

आपण पत्र पाठविले ते पावले. लि॥ की आपला मजकूर व राजश्री बापूचा फर्काबादेस यावयाचा जाहाला होता. तो त्याचा सल्हूक जाहाला म्हणून तिकडील मनसबा राहिला. सिकंदऱ्याकडे जावयाचा निश्चय जाहाला म्हणून लिहा व मला सुज्यातदौलाकडे जाणे म्हणून लिहा. त्यास मी उदैक जातो. त्रिंबकदासास अथवा भवानीदास यास आज येथे येऊन पावते करावे. भिंडेस ऐवज आला आहे. तो सिकंदऱ्यास पावता करणे म्हणुन लिहा होते. त्यास येवज येऊन सत्वर पावेल. भवानीदासास निरोप देऊन सत्वर पाठवावे. सुज्यातदेवलाकडे सल्हूकास पाठवीत होता. तो सल्हूक तो जाहला. आतां तेथे जाऊन त्यासी काय बोलावे, कसे करावे, ते आपण घराऊ लिहून पाठवावे. त्याज प्रो वर्तणूक करूं. बहुत काये लिहिणे व मी लिहा असे न कळू द्यावे. व सहजात श्रीमंत राजश्री बासूसहि पुसावे की याने काये बोलावे असे सहजात पुसोन उल्लेख करून खुलासा काहाडून लिहिला पाहिजे. परंतु असे कदाचित पुसल्यावर न जाणे म्हणुन म्हणतील तर बालाजी गोविंद याचे तैनातीस राहावे लागेल. यास्तव सुज्यातदौलाकडे तर जाणे होये हे ठहरावे. परंतु तेथे काये बोलावे, काये मनसबा ठहरावा, तो लिहा पाहिजे. व त्रिंबकदासास अथवा भवानीदासास सत्वर पाठवावे व तीर्थस्वरूप राजश्री गंगाधरपंत तात्यास आह्मी पत्र लिहा होते त्याचे उत्तर पाठवावे. असे सर्व ल्हाियाची उतरे जरूर तपसीलवार लिहा पाहिजेत. फिरोन सांडियांबरोबर उत्तर पाठवावे. सेवेसी श्रुत होये हे विज्ञापना.

चिरंजीव राजश्री तात्याबा व तथा राजश्री दाजीबा यासी अनेक आसीर्वाद. लिहा परिसीजे. हरघडी पत्र पाठवून संतोषाते पावित जाणे. लोभ कीजे हे आसीर्वाद.