Selections from the Peshwa Daftar 2.91: [1758] The letter mentions the punishment the Peshwa inflicted upon Bapuji Mahadeo Hingne, the Maratha Vakil at Delhi.
Selections from the Peshwa Daftar 2.91
- Language
- Marathi
2.91
श्री.
सेवेसी विज्ञापना. राजश्री बापूजी माहादेव याची वस्तभाव हती घोडी सर्व तेथे राहिली असेल. त्याची कूल जफ्ती करून जमा करून ठेवणे म्हणोन आज्ञा. आज्ञेप्रमाणे कारकून माणसें पाठऊन कूल वस्तभाव जप्त केली. चौकी बसिवली आहे. रोख येवज काहीच सापडला नाहीं. घोड्यांस पांच दिवस दाणा हतीस
[१ सांडणीस्वार.]
Ca 51-14 रतीब नाही. जागा आहे. घोड्यांची माणसे प्यादे बारगीर आहेत. ते बेदील होऊन चाकरी सोडून जाणारसे दिसतें. परंतु तूर्त त्याची दिलासी करून बंदोबस्त करून ठेविला आहे. घोड्यास माणसें पाहिजेत. बारगीर आहेत त्यास ठेवावे. तेव्हा खर्चासहि दिल्हे पाहिजे. घोडी उंटे हती यास चंदी पाहिजे. त्याची आज्ञा काय ते करावी. माणसे चाकर फरास सारवान प्यादे आहेत. त्याचे समाधान करून ठेवावे की जातील त्यांस जाऊ द्यावे याची आज्ञा केली पाहिजे. पत्राचे उतर येईतोपर्यंत त्यास ठेविले आहेत. जसी आज्ञा होईल त्याप्रमाणे वर्तणुक करूं. तपसीलवार उतर पाठवावयाची आज्ञा केली पाहिजे. सेवेसी श्रुत होये हे विज्ञापना.