Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 2.92: [1758] Vithal Shivdev's handwriting. He seems to address this letter to Raghunathrao on the subject of Najibkhan and complains about Malharrao Holkar.

Selections from the Peshwa Daftar 2.92

Language
Marathi

2.92

श्री.

विनंती उपरी. आपण आम्हा उभयतास दोन चिठ्या पाठविल्या त्या पावल्या. त्यातील मजकूर नजीबखानाचा खजाना मेरटेवरून पार जाणार याकरितां येथून जनार्दनपंत व लांबहाते तात्याकडील रवाना केले. आपण उभयतानी जावे. नाहीं तर राजश्री अंताजीपंथाची फौज व तुम्हाकडील विठल आपदेव पाठवावे. त्यास आमचा विचार जाला होता की तुम्हाकडील पथके येत न येत परंतु आपण गुरुवारी बुनगे पाठीमागें टाकून दरकुच गडमुक्तेस्वरास जावे. त्यास हली हे बातमी आली. उत्तम. उदैक बुधवारी प्रातःकाली चिरंजीव बापू व विठल आपदेव पुढे लांब मजलीनें जातील. आम्हीहि तडक बुनगे घेऊन पाठीवर जातो. जवळ राहिल्यास आम्ही संडे त्यात मागून सामील होऊं. बुधवारी द्वादसी x आम्हास थोडासा गुता, याकरिता येका दिवसाचे अंतरे सडी फौज पुढे रवाना केली. सनद अनुपशेहरची पाठवितीलच. पावले खर्चास यैवज दरमाहाचा भर रोजमरा जरूर पाठविला पाहिजे. बारगीर चाकरानी आडविले आहे. राणोजी देवकरास मलवानी आश्रा दिल्हा आहे हे उत्तम नाहीं. जावे तर त्यानें येकल्यानें जावें. बारगीर शिलेदार x १स न्यावयास प्रयोजन x (नाहीं). त्याच्या हरामखोऱ्या फार आहेत. हरामखोरास रागे भरावे. दुसऱ्याने आश्रा द्यावा हें उत्तम नाहीं. बहुत काय लिहिणें हे विनंती.

[१ एरंडे ?]