Selections from the Peshwa Daftar 2.93: [19-8-1758] Raghunathrao asks Jankoji Scindia at once to proceed to the north, which was being threatened by the Abdali.
Selections from the Peshwa Daftar 2.93
- Language
- Marathi
2.93
श्री.
राजश्री जनकोजी सिंदे
गोसावी यांसि
छ सकल गुणालंकरण अखंडित लक्ष्मी आलंक्रुत राजमान्य श्री रघुनाथ बाजीराव आसिर्वाद उपरी. येथील कुशल जाणोन स्वकीये कुशल लेखन करीत असिले पाहिजे विशेष. अब्दाली पठाण याची यावयाची अर्मैद गरम आहे. त्यास तो आला नाही तो आपण भारी व्हावे म्हणजे उतम आहे. तरी तुम्ही लौकरी यावें. येसी पेशजी तुम्हास पत्रे लिहिलीच आहेत त्याजवरून तुम्ही तयारी करून येतच असाल. हालींहि लिहीले असे. तरी फौजसुधा लावलाब मजली करून त्वरेने यावे. राा छ १४ जिल्हेज.