Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 2.94: [September 1758] Hingne reports to the Peshwa the visit of Malharrao Holkar to Jankoji and their reconciliation.

Selections from the Peshwa Daftar 2.94

Language
Marathi

2.94

श्री.

पोा छ ४ सफर ऊर्फ अश्विन

सन तिसा.

पु।। श्रीमंत राजश्री पंत प्रधान स्वामीचे शेवेसी.

विज्ञापना येसीजे. पत्रे सिध्द जालियावर वर्तमान आले कीं राजश्री मल्हारजी होळकर व राजश्री जनकोजी सिंदे यांची भेटी जाली. येकांती व लोकांत हा (वि) चार ठरलाकीं पूर्वा प्रो जे काम करणे ते ब(श)क करावे. या प्रकारे विचार जालियावर ज्या मुकामी होते तेथून कूच करून जैनगरच्या रस्त्यावर येऊन पडले. कच्छ(व्या)च्या राज्याकडील जाबसाल व मुलतानाकडील मामलत आणखी येकदोन राजकारणी आली आहेत. विजेदशमी जालियावर येक गोष्ट ठरेल तेथे तीर्थस्वरूप राजश्री पुरुषोत्तम माहादेव आहेत ते सविस्तर वर्तमान सेवेसी विनंती लिहित असतील. बहुत काय लिहिणें. कृपा केली पाहिजे हे विनंती.

[१ दाट अवई.]

Discussed in (1)