Selections from the Peshwa Daftar 2.95: [21-9-1758] Mahipatrao Panse writes to the Peshwa about the troublesome situation of the Emperor, his son and his Vazier after Raghunathrao had returned to the Deccan.
Selections from the Peshwa Daftar 2.95
- Language
- Marathi
2.95
श्री.
छ २२ मोहरम सु॥ तिसा.
सेवेसी महिपतराव लक्ष्मण सा। नमस्कार विज्ञापना एसिजे. येथील कुशल ताा छ १७ मोहरम जाणून स्वानंद लेखनास आज्ञा केली पाहिजे. विशेष. हिंदुस्तानाकडील वर्तमान जबामी कासद पातशाह व वजीर नजीक पाणिपत गेले आहेत. पातशाहजादा येमुणेचे पार कमाऊचे पाहाडात नजीबखान रोहिला आहे त्याजपासी जाऊन पंचवीस तीस हजार फौज रोहिल्याणे जमा करून पुढे ठेवितच आहे. जमाव होतो. पातशाहासी व पातशाहजाद्यासी साठी कोसाचे अंतर आहे. याजपासी तीस हजार फौज आहे. पुढे काये होईल वर्तमान येईल ते विनंती लिहून. राजश्री मल्हारराव होलकर व जनकोजी सिंदे उभयेतास वजिराही बोलाविले म्हणून शाहापुरचा फैसला चौ लाखास करून पुढे गेले. मालपुरापावेतो पोहचले. जबाणी सांगत होते. सत्यमिथ्या ईश्वर जाणे. आयेकिले लिहिले. पुढे जैसे वर्तमान येत जाईल ते लिहित जाऊन. हैदराबादेकडील वर्तमान आले आहे कीं नबाब सलाबतजंग व बसाल्तजंग छ १७ मोहरमी कूच करून कलबुर्गप्रांती येत आहेत. नबाब निजामआलिखानास बोलाविले. तेहि जानार आहेत. प्रस्तुत तो निजामआलिखानाही सिपाह (ई) लोकास तनखा जाफराबादेपावेतो देऊन स्वार तहसिलेबदल आले आहेत. पुढे वासिम परगन्याहून कूच जेव्हां करतील, वर्तमान येईल तेव्हां लिहून. निजामआलिखानाकडील मोगल हजुर येतो त्याजबार देवाजीपंत सैदलस्करखानी आहेत. येक दोन दिवस येथे होते. शामजीपंत टकले पुढे टोक्यास गेले होते. ते व हे मिळून हजुर येत आहेत. बहुत काये लिहिणे हे विज्ञापना.
श्रीमंत राजश्री दादासाहेब कासारीचा घाट चढून देशास गेले म्हणून येथे वर्तमान दरगाहकुलिखानास हरकऱ्यांनी दिधले. सेवेसी श्रुत होये हे विनंती.
Discussed in (1)
- Fall of the Mughal Empire — Sarkar 1932, English