Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 2.96: [7-10-1758] Antaji Mankeshwar communicates to the Peshwa the serious situation of Delhi and requests him to remedy it.

Selections from the Peshwa Daftar 2.96

Language
Marathi

2.96

श्री.

छ २८ सफर सन तिसा

श्रीमंत राजश्री पंतप्रधान स्वामीचे सेवेसी.

विनंती सेवक अंताजी माणकेश्वर कृतानेक सां नमस्कार विज्ञापना. सेवकाचे वर्तमान ता॥ आस्विन शुद्ध ५ मुकाम कोटपुतली सुखी असो विशेष. या प्रांतींचें वर्तमान व नजीबखान व दुंदेखान शाहजादा याचे बखेडियाचा तपसील पुर्वी सेवकाने तपसीलवार सेवेसी लिहिलाच आहे व राजश्री जनकोजी बाबानी लिहिला आहे. सारांश येथून सहा मजली त्याची फौज. सेवक जाऊन जे चाकरी घडोन येईल ते करीलच. आदिनाबेगखान छ १२ मोहरमी [ १६-९-१७५८ ] मृत्यु पावला. मारवाडची मामलत जाली. जैनगरचीहि जाली. कोटियाचा नवा राजा मृत्यु पावले. त्यांचेहि ठरले. परंतु दत्ताजी बाबा आल्याखेरीज जनकोजीबाबा दिलीकडे येत नाहीत. मुख्ये आजी गाठ घालून पारपत्ये करितो. निर्मूल करणे, झाडून बुडणे तरी सिंदे आलियाउपरि होईल. बंगालियाकडे आस्विनमासी जावे परंतु रोहिलियाच्या हंगामामुळे कार्तिक मासावरी जाणे गेले. बारीक मोठे या प्रांतीचे तपसीलवार वर्तमान तीन बद श्रीमंत राजश्री दादासाहेबचे पत्री विनती लिहिले. ते स्वामीस विनती करितील. सारांश गोष्टी, सेवक हरामखोरी करणार नाही. मोठीच चाकरीन, खावंदहि कृपा करितील. मी घरचा खानाजाद. मजला लोकादेखता वारंवार जनात वाईट बोलावे. त्यामुळे कवडीचे माल होतो. ते स्वामीचेच नुकसान. अभाव पडिला असील त्यास येक वस्त्रानसी घराबाहेर निघोन. जे असेल ते स्वामीचे, कोठून आणिले नाही. जे आहे ते सर्व स्वामीचे. परंतु पंचवीस तीस लाख देणे आजी साहुकारी असता उलटा आभाव आणिकच जाला. कच्या धागियाची रयेत. स्वामीची आखेरसाली आली. यावरी जीवप्राण हजीर आहे. वतनी चाकर जाते पलते नाही. आपल्या मुखे इतराजी फर्माविलीयावरी सेवकाचे कल्याण काये ? काही सेवकाची विनती श्रीमंत राजश्री दादासाहेब करितील. ते करावयासी स्वामी समर्थ आहेत. रा. सुभेदारांनी दीनाबेग सदीपेगास पत्रे लिहून वजिराच्या हिश्शात दोन चार लाखचे मात्र खलेल करविले. वरकड बट्टा चालविला तो वजिराच्या द्वेशाकरिता. तरी वजिराकडे जामिनीचा पैका फार फौज ठेवली त्याचा फार. ऐसे भारूड खलेल याची रुपयास नसावे. कौलात अंतर. पुढे पुर्वेचत्या कामात खलेलच्या. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना.

Discussed in (1)