Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 2.97: [5-11-1758] Antaji Mankeshwar writes from the North to Ramaji Bawa (Chitnis) asking him to speak in his favour to the Peshwa about the dispute he had with Vithal Shivdeo.

Selections from the Peshwa Daftar 2.97

Language
Marathi

2.97

श्री.

राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री रामाजी बावा

गोसावी यांसी.

स्नेहपूर्वक अंताजी माणकेश्वर, कृतानेक आशीर्वाद, विनंती उपरी. येथील कुशल तागाईत कार्तिक वद्य ५ मुक्काम खिचीवाडा जाणून स्वकीये लेखन करीत गेले पाहिजे विशेष. आपणांकडून अलीकडे पत्र येऊन वर्तमान कळत नाहीं. तरी यसें न करावें. सदैव पत्रद्वारें सांभाळ करीत असावें. यानंतर श्रीमंत राजश्री......पंत प्रधान स्वामींस व श्रीमंत राजश्री भाऊसाहेबांस पत्रें पाठविलीं आहेत. तरी आपण उत्तम समय पाहून अक्षरशाहा पत्रें वाचून दाखवावीं. मजकुराचा मजकूर सांगोन त्याचा जाबसाल उत्तम रीतीचा लिहून पाठवावा. आपण दरबारीं आहेत. याजकरितां आम्ही बेफिकिर या प्रांतीं आहों. राजश्री विठ्ठल शिव देव दरबारीं आले आहेत. त्यांची आमची स्पर्धा आहे. तें आपणास ठाऊक आहे. आम्हाविशीं नानाप्रकारच्या आदावती सांगतील. त्यास दरबारीं आमची वगवशिला सर्व आपण आहेत. आपले मांडीवरी उसें ठेऊन दूरदेशीं या प्रांतीं आलों आहों. सर्व भरवसा आपला आहे. आम्ही वारंवार लिहावें यैसा अर्थ नाहीं. आपलें थोडें बहुत तुलसीदल द्यावें, तें तीर्थस्वरूप राजश्री हरीपंत दादा यांजकडून देविलें आहे, तें आपणांस पावतें करितील. सर्व भरवसा दरबारीं हरयेकविशीं आपला आहे. आम्ही लिहावें यसें नाहीं. बहुत काये लिहिणें. या प्रांतीची कांहीं शें दोनशें रुपयेपर्यंत फरमास आपली असली तरी आम्हास ल्याहावी. प्रविष्ट होईल. आमच्या पथकाची वकिली स्वामींकडे आहे. न्युत्यें पूर्ण सांभाळित असावें. विस्मरण पडों न देणें. बहुत काय लिहिणें. कृपा आसो दीजे हें विनंति.