Selections from the Peshwa Daftar 21.91: The writer reports the attitude of the Rajput Princes and their intrigues against the Marathas with Najib Khan and Shah Alam.
Selections from the Peshwa Daftar 21.91
- Language
- Marathi
21.91
[seal: श्री ३]
पुरवणी साहेबाचे शेवेशी
रांगड्याचें लागले आहेत. पाहावे. राजश्री सुभेदाराकडील दबाव आहे. याच्या चितात बिघाड उत्तम प्रकारें करावा कैसा विचार आहे. प्रस्तुत त्रिवंडीशामराम याचे कारण बहुत. याचे विचारें मसलतीनें राजे चालत आहे. राजकारणात बहुत पेश्र्वं. सर्व कारभार त्याचे हस्तें होत आहे. सर्व मुतसद्दी मुसाहेबे त्याचे विचारें कारभार करितात. त्यानी हा विचार करून राजे बाहीर काढिले. राज्यापासीं दहा बारा हजार फौज उणी थोर पावेतो सामील होईल. सेखावंत तमाम येणार आहेत. भारी जमाव एका जागा करावयाचा विचारें आहे. नजीबखान यासी पैगाम बहुत आहे. आकुबअलीखान मथुरेस होते ते दिल्लीस गेले कैसे वर्तमान आहे. त्याजकडील वकील राज्याकडे आला आहे. कागदपत्र त्यासी राजकारण आहेच. शहाआलम यासी पैगाम बहुत लाविले आहे. भला माणूस त्याजकडे पाठवावयांचा विचार आहे. सर्व राजे रजवाडे एका जागा होऊन पका विचार करून भारी राजकारण करावे या डौलात आहेत. पुढें जो विचार होत जाईल ते सविस्तर लिहीत असो. राजश्री जनकोजी सिंदे याजकडील वर्तमान उज्जनीस गेले कैसे वर्तमान यैकितो. परंतु निश्चयें वर्तमान कांहींच नाहीं. सैन्यातून राजश्री सुभेदाराची पत्रे अली. वर्तमान तथ्य कांहीं आलें नाहीं. निश्चयें वर्तमान ध्यानास आलिया सविस्तर लिहीत असो. राजे माधोसिंगजी यानीं मातबर हवेली राहावयास दिल्ही होती ते घेऊन पदमर्सिग गोगाव्रत पैनासिंगाचे बंधू यास रहावयास दिल्ही. आम्हास राहावयास दुसरी जागा देवविली आहे. प्रस्तुत सैन्यांत राज्याबरोबर गेलो आहे. येथील कारभार आल्पबुधी सर्व दबावाचा सर्व साहेबास श्रुत आहे. सर्व गोष्टींनें गौर सांभाल करावयाचा साहेब धणी समर्थ आहेत. विशेष काय लिहिणे ? कृपा वरधमान केली पाहिजे हे विज्ञाप्ति.
[१ वजनदार. २ स्नेही.]
Discussed in (1)
- Fall of the Mughal Empire — Sarkar 1932, English