Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 21.92: [2-12-1761] Chinto Krishna reports to Raghoba a severe action between Holkar and Madhosing. Madhosing's army was routed.

Selections from the Peshwa Daftar 21.92

Language
Marathi

21.92

पौ छ ३० जावल

श्री

श्रीमंत माहाराज राजश्री दादा

साहेब साहेबाचे शेवेसी

विनंती. सेवक चिंतो कृष्ण चरणावर * * क ठेऊन सिरसाष्टांग नमंस्कार विज्ञापना. सेवकाचे वर्तमान ता॥ छ ४ माहे जावलपर्यंत यथास्थित आसे विशेष. अंतरवेद प्रांताहून उजेनीस आलो. पुढे देशास यावे तो हाडोती प्रांते माधोंसिंगाच्या फौजेन तमाम ठाणी उठविली. धूम केली. त्यावरून राजश्री सुभेदारांनी आम्हासहि समागमे घेतले. कूच दरकूच पा॥ मांगरोल प्रांत हाडोती प्रां॥ कोटे येथे * * * * त्यासी गाठ घातली. त्यास कछव्या * * * * * * राजसिंग घोडचढा व नंदलाल दिवा * * * * कविराम व सुरतराम वगैरे सरदार (ऐ) से दाहा बारा हजारा फौज व तोफा व रहेकले व बाणाचे उंट वगैरे जुंजाचा सरंजामेनसी होते. त्यास छ १ जाली मागील चार घटका दिवस राहाता गाठ पडली. त्यास च्यार घटका रात्रपावेतो गोलागोलीचे युध्ध जाले. उपरांतिक रात्र जाली म्हणोन च्यार प्रहर रात्र कंबरा बांधून घोड्यावर उभेच राहिलो. छ २ जावली इंदुवासरी जुंज प्रातःकालापासून अस्तमानपर्यंत जाले. साहेबाचे प्रतापे फौज तमाम कछव्याची मोडून कुल लुटून घेतली. घोडी उंटे वगैरे सरंजा(म) कुल * * लुटला. त्याजकडील मोठे मोठे पटाईत * * * * कितेक घायाल होऊन पडले. से दोनसे मात्र पलून गेले. ईश्वरे येश स्वामीस दिल्हे. येणे- करून हिंदुस्थानात नक्ष जाला. आम्ही डावे बाजूस होतो. यथानशक्त शेवा-चाकरी केली. सरकारपागेस से सवासे घोडे आले. त्याशिवाय उंटे आली आंसत. आम्हाकडील लोक कितेक पडले व जखमी जाले त्याची याद मागाहून शेवेसी विनंतीपत्री * * * * रून पाठऊ. राजश्री मल्हारजीबाबा- च्या (डा)व्या हातच्या मनगटास गोळीची जखम लागली. गोळी चाटून गेली. स्वामीचे कृपेकरून खैर जाली. चिंता न करावी. सेवकावर कृपा करून आज्ञापत्र पाठऊन परामृष करणार स्वामी समर्थ आहेत. सेवेसी श्रुत होये हे विज्ञाप्ति.

Discussed in (1)