Selections from the Peshwa Daftar 21.93: [2-12-1761] Khanaji Jadhao to Sakharampant, informing him of an engagement between Madhosing and himself in which the former sustained a severe defeat. Malharrao Holkar who assisted Jadhao received a slight wound on his left hand.
Selections from the Peshwa Daftar 21.93
- Language
- Marathi
21.93
पौ छ ३० जावल
श्री.
राजश्री सखारामपंतबापू गोसावी यांसी
[seal: सकलगुणांलंकंरण अखंडितलक्ष्मीआलंकृत राजमान्ये श्नो खानाजी]
जाधवराव दंडवत विनंती. येथील कुशल ता छ ४ जमादिलावल मुकाम मांगरूळ प्रांत हंडोती जाणौन स्वकीये कुशल लेखन करीत गेले पाहिजे विशेष. इकडील वर्तमान तर राजश्री माधोसिंग याची फौज दाहा बारा हजार येऊन कोठ्यांचे प्रागण्यात धामधूम करीत होता. त्यास राजश्री सुभेदार व आम्ही मिलोन कच्चव्याचे फौजब्र गेलो. त्यास छ ३ जमादिलावली इंदुवारी येक प्रहरा दिवसा उपरांतिक तो अस्तमान होईपर्यंत जुंज जाले. कच्चव्याचे फौजचा मोड जाला. त्याजकडील थोरथोर पटाईत कामास आले व बुनगे व तोफखाना लुटला. दाहाबारा हजारानतून च्यारतीनसे स्वार पलोन गेले. नाहीं तर फौज आगदीं संतेनासास मिलोन दिल्ही. ईश्वरे आपल्यास येस दिल्हे. हिंदुस्थानात मोठा नक्ष जाला. कच्छवे मोठा जोराने भारी जमाव करून आले होते कीं, नर्मदेपावेतो अंमल करावा. श्रीभगवंतकृपेकरून त्याचेच पारपत्य जाले. पलोन गेले. संतोषाचे वर्तमान आपल्यास कळावें. राजश्री मल्हारजीबावा सुभेदार यास गोळीची जखम डाव्या हतास लागली आसे. चाटून गेली. हालकी आहे. चिंता न करावी. ईस्वरे खैर केली. विशेष काय लिहिणे ? लोभ आसो दीजे हे विनंति.
2287