Selections from the Peshwa Daftar 27.100: [1754 ?] Vithal Shivdev intimates the arrangements made for an interview between two eminent persons. Can they be the Jat Raja and Raghunathrao?
Selections from the Peshwa Daftar 27.100
- Language
- Marathi
27.100
श्री
१सेवेसी विज्ञापना. दिवाणजी व आम्ही जैसे बागात आहो. सर्व तयारी जाली आहे. बंदोबस्त हा कालपर्यंत आपलाच आहे. त्याचे लोक थोडेके आहे. राजेश्री बराबर येणे ते येतील परंतु बाहेर राहातील. बागात आपले व त्याचे जैसे से दोनसेपर्यंत येतील परंतु ते आपणासी भाऊपणा करणार. पूर्वीचा तो आहेच. सांप्रत याच्या विचारे दिसते. पगडी बदलाबदल होईल.
[१ विठ्ठल शिवदेवाचें हस्ताक्षर.]
3612 त्यास आपण सिरपेच भारी बांधला आहे तो समयास काढता येणार नाही. त्यास मालबाचा सिरपेच आपण बांधावा. सिरपेच पगडीवर असला पाहिजे. केवल सादे कामास येत नाही हे विज्ञाप्ति. यात स्वामीच्या विचारास येईल तैसे करावे हे विज्ञाप्ति. सत्वर यावे. दिवस हलका रात्र होईल. वाट आडचण आहे.