Selections from the Peshwa Daftar 27.99: [1754 ?] On account of heavy rain, Vithal Shivdev proposes to Sakharam Bapu to postpone his advance (towards Delhi).
Selections from the Peshwa Daftar 27.99
- Language
- Marathi
27.99
श्री
राजेश्री बापू स्वामीचे शेवेसी
विनंती उपरी. अलाहिदा पत्र लिहिले आहे त्यात मजकूर की चिरंजिवास रवाना करितो. मागून येका मजलीने बुनंगे घेऊन जाऊ जैसे लिहिले होते. त्यास तेहि पत्र वाचून पाहावे. त्यात येक दोन मजकूर आहे. सांप्रत राजश्री अंताजीपंत नाना यानी आम्ही मिलोन विचार केला की प्रजन्यकाल सडे फौजेचा आब राहाणार नाहीं. फौजहि थोडी निघेल याकरिता आम्ही उदैक बुधवारी कूच करून जातो. तीर्थाचा गुंता आहे तो मागे राहून उरकून आम्ही मागून जाऊ. पुढे लस्कर कूच होऊन जाईल. आपणास कळावे म्हणून लिहिले असे. बहुत काये लिहिणे हे विनंती.