Selections from the Peshwa Daftar 27.101: [1754] Vithal Shivdev sounds a note of warning against Har Govind.
Selections from the Peshwa Daftar 27.101
- Language
- Marathi
27.101
सेवेसी विज्ञापना. रा। हरगोविंद याजकडे रा। गणेश विनायक याजला पाठऊन पुढे मोर्च्यास जागा उत्तम आहे तेथे मोर्चा तोफासुधा बसवावा त्यावरूत त्यांनी त्यासी बोलोन तेथील मजकुराची चिठी आली ती सेवेसी पाठविली आहे ते मनन करून हर गोविंदास राजश्री मल्हारबाकडून फजीत करवावे. त्याचा त्याचा घरोबााहे याकरिता विचारे फजीत करितील. दुसरेयाने आपली फौज आणीख आणविली आहे सब(ब)की आपण जबरदस्त होऊन बसावे. दोहीकडून दबावाने आसावे येसा मनसबा याचा आहे. राजश्री मानाजी पायगुंडे याजकडे बाणाची कैची १ व बाणदार येसा सत्वर पाठवावयासी आज्ञा करावी. आम्हाजवळ बाण आहेत ते थोडके आम्हासच पाहिजेत. सेवेसी श्रुत होये हे विज्ञाप्ति.