Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 27.102: [1754 ?] Vithal Shivdev reports the progress of the attack assigned to him and proposes a plan of action against Delhi.

Selections from the Peshwa Daftar 27.102

Language
Marathi

27.102

१विनंती उपरी. ताकिदीचा आचा मजकूर बलवंतरायाची राऊत ताकीद-दाराच्या रुजू मोझ्या जाला. लटके जाले. धारोजी नाईकादेखत लटके तुफान घेतात त्यास इलाज काये करावा ? दुसरे ये प्रांती आमचा वलवाटा दिलीस नवता त्यामुळे नाहीं. अंताजीपंताचा फार आहे. गोष्ट वलवठ्यांत कागदीपत्री ये ते करावे. दुसरे श्रीमंतास पत्रे जाला मजकूर ल्याहा(वा). दिलीकडे बोलवावे. रेवाडीपासून जपत्ती करीत यावे तैसे करावे. आजच रुपरायावर वजन काये पडेल ते पाहावे. बहुत काये लिहिणे हे विनंती.

[१ समग्र हस्ताक्षर विठ्ठल शिवदेवाचें.]