Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 27.103: [1755] Vithal Shivdev asks orders (probably from Raghoba) where he should encamp, and requests an early settlement with Antaji Mankeshwar.

Selections from the Peshwa Daftar 27.103

Language
Marathi

27.103

श्री

+विनंती उपरी. आज मुकाम जवळ का केला. आम्ही तो मजल तीन कोस आपली आदीक जाली असती तरी तेथेच येणार होतो. रुपराम श्रीमंताकडे गेला तर गोहदवाल्याचा मजकूर करील. गोहदवालाहि बरोबर गेला असेल. आमचे मामलतीचे रुो रुपराम आपले मामलतीत लाऊन घेणार, तेव्हा आम्ही मुलूक सोडून वरात सुरजमलावर व्यावीसी होईल. त्याजपेक्षा जमिनदारापासून आपमान करून घ्यावा तो सरंजामच सोडून द्यावा हे उत्तम. याकरिता श्रीमंतास मुजरद हा मजकूर ल्याहावा. आगरे येथील सुभ्याचा जाबसाल ल्याहावा मग त्याच्या चितास येईल ते करतील परंतु आपण अगत्यरूप ल्याहावे. राा अंताजीपंताचे इटावा येथे ठाणे बसवून द्यावे. हा मजकूरहि ल्याहावा. अंताजीपंताची आमची गांठ घालून सरंजाम येकत्र निवडून द्यावा जैसे आपण बोलिले ते गोष्टीचे स्मरण असो द्यावे. उदैक मुकाम किती कोसी ते लिहिले पाहिजे. विशेष काये लिहिणे हे विनंती.