Selections from the Peshwa Daftar 27.181: [19-1757] Ragho Lakshman Purandare, the Peshwa's agent at Lucknow, after making enquiries about the attitude of Shuja-ud-daula towards the Marathas, assures Sakharam Bapu of his willingness to co-operate.
Selections from the Peshwa Daftar 27.181
- Language
- Marathi
27.181
पौ छ ३ रौवाल
श्रीगजानन
श्रीमंत राजश्री बापूसाहेब
स्वामीचे शेवेसी
सेवक राघो लक्ष्मण कृतानेक सां नमस्कार विनंती. येथील कुशल ता॥ छ १ शवाल मु॥ दर लस्कर नबाब सुज्यायेतदौले स्वामीच्या कृपावलोकनेकरून यथास्थित असे. स्वानंदलेखन करावयासी आज्ञा केली पाहिजे. विशेष काल छ ३० रमजानचे पत्र तपसीलवार वर्तमान लिहून पाठविलें तें शेवेसी पावलेंच असल. कालचे वर्तमान नवाबास पुसिलें कीं तुम्हीं श्रीमंत राजश्री बापूंस व राजश्री तात्यास बोलावयास भवानीदासास पाठविलें; व आमचे मारफतीने पत्रेंहि पाठविलीं आहेत. त्यांची पत्रे आम्हास आलीं कीं आम्हीं दिलीकडेल जात होतो; परंतु नवाबाच्या कार्यामुळे फिरलो; दरमजल येतो; आणि तुम्हीं सळख करितां ये काये आहे, हे गोष्ट परिछिन सांगावी; त्यासारखें आम्ही त्याजला लिहून त्याजवर बोलिले कीं मी सळख करीत नाहीं. तुमची फौज येईपावेतो जाबसालाखाले घालून दिवसगत लावितों. मग आम्हीं अर्ज केला कीं येणेंप्रमाणें पत्रे ल्याहावी. मग नवाबानी स्वामीस व राजश्री तात्यास पत्रें खास मोहरनसी येणेंप्राच लिहिलीं आहेत. पूर्वीहि नवाबानी बोलावयानिमित्य पत्रें ल्या व भवानीदासास पाठविलें आहे. स्वामीस बोलवावयाचा कांहीं गुंता राहिला नाहीं. जाबसालाची गोष्ट भवानीदासाने सांगितलीच असल. आम्हांस तर कांहीं खुलासा सांगितला नाही. स्वामीच्या ध्यानास रदबदल आलीच असल. स्वामीनी पूर्व पत्रीं लिहिलें होते कीं येक सरदार दाहा हजार फौज देऊन पाठवून त्यास पठाण व रोहले व गाजुदी मिलोन भारीच आहेत. आपले सामान पोख्त असावे. यावर स्वामीची मर्जी जैसी असेल तैसें करावें. आम्हीं हे गोष्ट नवाबास सांगितली नाहीं; कारण की ये गोष्टीने नबाबाची खातरजमा येकंदर न होती. भवानीदास जाबसाल करितो हे गोष्ट आमच्या विच्यारेंकरून करते तर येथे प्रतिष्ठा असती. सांप्रत स्वामीसहि कार्यावर दृष्टी द्यावी लागते, याजकरिता तेथील प्रसंग श्रवण करावा. स्वामीचें आगमन इकडे जालियावर बहुत कामैकाजें पडतील. प्रतिष्ठा सर्व स्वामीची आहे. काल पातशाहाचा खास षुक्का नवाबास आला कीं आम्हीं शाहाजाद्यास व गाजुदीखानास लिहिलें आहे, ते तुम्हासी कजिया करणार नाहींत. रोहल्या [ यापुढील बंद गहाळ ]