Selections from the Peshwa Daftar 27.182: [21-6-1757] Gopalrao Ganesh who was deputed by Sakharam Bapu to effect a reconciliation between Shuja and Ghaziuddin, reports to Dadasaheb his arrival in the Doab.
Selections from the Peshwa Daftar 27.182
- Language
- Marathi
27.182
श्रीगजानन
श्रीमंत राजश्री दादासाहेब
स्वामींचे सेवेसी
विनंती सेवक गोपालराव गणेश कृतानेक सां नमस्कार विज्ञापना. येथील कुशल तागाईत छ ३ माहे सवाल मुकाम कान्हेरा प्रात अंतरवेद यथास्थित असे विशेष. स्वामीची आज्ञा घेऊन राजश्री सखारामपंत बापू बराबर आलो ते मजल दरमजल आगऱ्यापासी यमुना उतरून अंतरवेदीत आलो. साहादाबादेच्या मुकामीहून नवाब गाजदीखानाकडे रा। त्रिंबकपंत दि॥ अंताजी माणकेस्वर यास पाठविले आहेत, त्याजवर नवाब सुज्यातदौल याजकडे आम्हास खाना केले आहे. त्याचे सैन्यात गेलियावर जो विचार होईल तो सेवेसी लिहून पा॥ छ मजकुरी रा। सखारामपंत बापूचा निरोप घेऊन मुकाम मजकुरास आलो. येथून दरमजल नवाबाच्या लस्करात जातो. नवाब गाजदीखानाचा व नवाब सुज्यायेतदौला याचा सल्लक करून द्यावा याजकरिता पाठविले आहे. आपणास कळावे. सेवेसी श्रुत होये हे विज्ञापना.