Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 27.183: [6-6-1757] Trimbak Shivdev reports what his detachment in the Doab was doing. Most of the outposts that were lost last year have been reoccupied, adds the writer.

Selections from the Peshwa Daftar 27.183

Language
Marathi

27.183

श्री

श्रीमंत राजश्री सखारामपंत बापू

स्वामींचें शेवेसी

पोष्‍य त्रिंबकराव सिवदेव कृतानेक साष्टांग नमस्कार विनंती. येथील क्षेम ता॥ छ १८ रमजान मुकाम मेणपुरी जाणौन स्वकीये कुशल लेखन केले पाहिजे विशष. स्वामीनी पत्र पाठविले तें छ १७ रमजानी मुकाम मजकुरास पावले. तेथें लिहिले की कोणे ठिकाणी आहा, काये वर्तमान आहे, तें लेहून पाठवणें म्हणौन लिहिलें. त्यास मेणपुरीस शह देऊन आहो. मामलत चुकत नाही व भीवगावचे गढ्या च्यार पांच राज्याकडे आहेत व सकेटीकडील गाव दाबून बसला आहे; सोडीत नाही. वकिलासी जाबसाल लागला आहे. सात आठसें स्वार तालगाव व कनोजेस ठाणे बसवावयासी पाठविले आहेत. वरकड कितेक

3687 व्रत या प्रांतींचे राजश्री बालाजी गोविंद यानीं लिहिलें आहे त्यावरून विदित होईल. कळलें पाहिजे. बहुत काये लिहिणें ? कृपा केली पाहिजे हे विनंती.