Selections from the Peshwa Daftar 27.184: [June 1757] Raghoba reports to the Peshwa the arrangements that he has made in the Doab. He also says that the differences between Hingne and Antajipant had been adjusted by him.
Selections from the Peshwa Daftar 27.184
- Language
- Marathi
27.184
[ पहिला बंद गाहाळ ]
तूर्त गंगोबास पुढे पाठविले आहे. ते जूझाचे व पुढील मनसुब्याचे गडबडीत आहेत. सारे करून घेऊन वाजबी वाटणीप्रो रुपये येत ते करितो. पुढे अंतरवेदीचे मामलेयात आम्हास पुरवले तरी जुने कमाविसदार करार करू; नाही तर दुसरे ठेऊ. वकिलात व अंताजीपंतास पेच तूर्त न पडे ते केले आहे. त्याची फिकीर न करावी. पुढे जे होईल ते लिहून. येथे कोणाचा आब तोडीत नाही; परंतु लिहिले तें गुप्त राही ते करणार स्वामी समर्थ आहेत. मग स्वामींचे आज्ञेप्रो ज्यास जसे करावयाचे येईल तसे करू. बहुत काय लिहिणे हे विनंती.