Selections from the Peshwa Daftar 27.185: [June 1757 ?] This appears to be a letter addressed to Raghunathrao about a certain Raja who had been induced to submit to the Marathas; the Raja had taken offence against Holkar.
Selections from the Peshwa Daftar 27.185
- Language
- Marathi
27.185
**श्रीगजानन**
विनंती शेवेसी विज्ञापना ऐसीजे. आजी शुक्रवारी राजे आमच्या डेरियास आले. लस्करात दाटी बहुत, याकरितां त्याचेच डेरे आणून ढाळा पुढे जागा केली. तेथें आम्हीं गेलो. तेहि आले. सिष्टाचार आम्हीं दोन पोशाक दिल्हें. घोडा व हती नजर केला. वस्त्रे मात्र ठेविले. घोडा व हती न घेतला. त्याजकडील निरोप आजीच घेतला. निरोपाचा गुंता ठेविला नाही. त्यानी वस्त्रें व सिरपेंच व १ हती दिल्हा. हती कुंद होता म्हणून माघारा दिल्हा. प्रातःकाळी दुसरा येईल. इतःपर रुपये येथेच घ्यावेसा करार. पैकी काही हुंडिया घ्याव्या लागतील. विनाहुंडी निर्गम होत नाही. वरकड नगदच घेतो. हुंडी थोडींसी घेऊ. त्याची विनंती समक्ष करणें ते करूं. बोला व रुपये यास्तव शनवार रविवार दोन दिवस लागतील. काम करून सेवेसी येऊन पोहचतो. (या) जकडील पत्रांचा गुंता अंताजीपंताचे पत्र तों कृपा करून पाठविले तैसेच राजश्री दत्ताजी सिंदे याचे पत्र पाठविलें म्हणजे गुंता कोणे गोष्टीचा राहात नाही. दोन्ही पत्रे दिल्हीं म्हणजे रु॥ व बोला वगैरे काम येथेच करून घेऊ. रा॥ दत्ताजी सिंदे याचें पत्राचा मात्र गुंता आहे; तरी जरूर पत्र पाठवावे म्हणजे सर्व कामकाज दो ती रोजात करून पैका व बोला व कारभारी घेऊन सेवेसी सत्वरच येतो. याउपर रा॥ आंताजी माणकेस्वर व रामराऊ नीलकंठ यानीं दाहा लाख रु॥ याचा हवाला घेतला, तेव्हा राजियापासून मनोतीचे रुपये पन्नास हजार याचे खत करून घेतले. ते मशारनिल्हेजवल आसे. आज्ञा जाली तरी पन्नास हजार पाचा लाखाचे खत घेणे लागते. याजवरी हेहि पन्नास लेहून घेऊन साडे पाचाचे खत सरकारचे नांवे लेहून घेऊ. येविषयीं आज्ञा करणे ते करावी. बहुत कायै लिया विज्ञापना.
[+ पत्र राघोबाचें पेशव्यास.]
याउपर रा॥ सुभेदाराकडील पूर्वी सेवेसी विनंती लिया त्याप्रा॥ ठराव करून कारभारी घेऊन येतो. मग आपले मरजीस येईल ते करावे. कारभारीसमागमे हरीसा वगैरे रजपूत येतील. याची इजत प्रतिष्ठा राखावी. रा॥ सुभेदाराचा राग यासी जडला आहे. येविषयी वचन आमचे घेतले. सेवेसी श्रुत व्हावे. वरकड काम वचन समक्ष करून देणार खावंद समर्थ आहेत. हे विज्ञापना.