Selections from the Peshwa Daftar 27.186: [1-7-1757] Gopalrao Ganesh to Sakharam Bapu, enquiring about the movements of several sardars in the Doab and about the money sent with Ramchandra Krishna.
Selections from the Peshwa Daftar 27.186
- Language
- Marathi
27.186
श्री
श्रीमंत राजश्री बापू स्वामीचे-
सेवेसी
विनंती सेवक गोपालराव गणेश कृतानेक सां। नमस्कार विज्ञापना. येथील कुशल ता॥ छ १३ माहे सवाल मुकाम मैनपुरीचे मैदानातून कूच करून नबी-गंजावर यथास्थित जाणोन स्वकीये कुशल लिही ती आज्ञा केली पाहिजे विशेष. आपण आनुपशहराकडे गेलेत म्हणौन येकिले; त्यास कोणीकडे फौज आहे, श्रीमंताकडील काय वर्तमान, राजश्री त्रिंबकवंत सुभेदार गाजदीखानाकडे गेले होते त्याजकडील काये वर्तमान तपसीलवार लिहून पाठवायासी आज्ञा केली पाहिजे.
3689 राजश्री रामचंद्र कृष्ण याजबा खजिना महत्पुराहून लाख रुपये येत होते ते फिरोजाबादेस आटकाविले आहेत म्हणौन यैकिले होते त्याजवरून रा। विठलराव सिवदेव याचे कासिदाबार पूर्वी लि॥ होते व हल्लीहि लि॥ जाते. तरी त्या यैवजाचा शोध मनास आणून आणविला पाहिजे. आम्ही दरमजलीने आज्ञापिले कार्यास जात आहो. राय भवानदास यासी पुढे पाठविले असे. आम्हीहि जातच आहों. श्रुत होय हे विज्ञापना.