Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 27.187: [Recd. 1-7-1757] Sakharam Bhagvant is requested to make arrangements for the payment of money due to Samsher Bahadar.

Selections from the Peshwa Daftar 27.187

Language
Marathi

27.187

पौ छ १३ शौवाल

श्री

राजश्री सखाराम भगवंत स्वामी गोा यासी

विनंती उपरी. समसेरबाहादर याजकडील वरातेचा यैवज गोविंद बलाल व गोपालराव बापूजी याजवर आहे. तो यैवज सध्या पावत नाही याजकरिता तुमचे लस्करात सावकार आहे त्याजवल मारनिलैनी करार केला आहे की वराता येऊन निमे यैवज सध्या द्यावा. वरातेचा यैवज झाडून पावेल. यावर निमे यैवज राहिला तो द्यावा, येणेप्रो करार केला आहे. येविसी कमाविसदारास ताकीद होऊन लौकर यैवज सावकारास पाविला पाहिजे. याजकरिता गोविंद बलाल व गोपालरा(व) बापूजी यास ताकीद करून सावकारास यैवज पावता करणे. सारांश सावकाराची निशा होऊन त्यास यैवज निमे पावे ते करणे हे⁺ विनंती.