Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 27.188: [8-7-1757] Janardan Ram reports to Sakharam Bapu the efforts that he made in quelling the disturbances of the Rohillas and regaining lost ground. The writer further requests Bapu that his efforts may be rewarded.

Selections from the Peshwa Daftar 27.188

Language
Marathi

27.188

पौ छ २२ सवाल

श्री

श्रीमंत राजश्री बापू स्वामीचे सेवेसी

पो जनार्दन राम सा। नमस्कार विनंती. येथील कुशल ता। छ २० सवाल सायंकाल च्यार घटका रात्र मुकाम खानपूर पा। शाहाणे स्वामीचे कृपेकरून

[+ पत्र राघोबाचें. कारकुनी लेखन रामचंद्र गणेश कानडे याच्या हातचें.]

3690 सुखरूप असो विशेष. आज्ञा घेऊन स्वार जालो ते मुकाम मजकुरास आलो. मार्गी प्रजन्यनाने फार हैरान केले ते पत्री कोठपर्यंत ल्याहावे ? जागाजागा दोन च्यार रोज झडीमुळे अटकौन राहिलो. परंतु पडत झडत आज्ञेप्रा येथे येऊन पोहचलों. रोहिल्याचे सरहेंत आलो. जमीदारास बलावणे पाठविले आहे. नरसाणे, खानपूर साहाणे वगैरे ठाणी रोहिल्याची आहेत यांचा बंदोबस्त करून गडमुरुतेस्वरास जातो. जंगबाजखान याची बातमी या प्रांती किमपि लागत नाही. तिकडेच गाजदीखान याजपासीच आहे येसे म्हणतात. फौजा या प्रांती आल्या याउपर त्याचेने इकडे येवते येसे नाही. आम्ही आज्ञेप्रा ताकिदीनेच येथपर्यंत येऊन जमीदार या परगण्याचा हाताखाली घालून ठाणी हस्तगत करितो. सामदामेकरून हाती लागेल तर बरेच. नाहीतर मोर्चे लाऊन येक दुसरे कापून काढितो. स्वामीचे आगमन या प्रांती लौकरच होईल. आम्हाकडे येक दुसरा परगणा द्यावयाचे मानस खावंदाचे असल्यास आज्ञा करावी. मी पदरचा सेवक. आज्ञेमाफक बर्तावे इतके जाणतो. सर्व चिंता फिकीर स्वामीस मान अभिमान आहे. लोकांचे पोटाविणे हाल फार जाले आहेत. पोटाची बेगमी करावी. खासा स्वारी इकडेच येणार किंवा दुसरा रोख हे ल्याहावे. आम्ही कितेक दिवस राहावे हे सविस्तर आज्ञा करावी त्याप्रो वर्तणूक करू. स्वामीचे पत्र सादर जाले तेथे आज्ञा की कारकून पाठविणे. त्याजपासी या प्रांताचे कामकाज सांगणे आहे म्हणौन आज्ञा. त्यास आम्ही दूर आलो. कारकुनाचा मार्गी निभाव होणार नाही. याजकरिता स्वारी आलीकडे आलियावर सेवेसी पाठवितो. रोजमंरेयाची बेगमी करणार स्वामी धणी असेत. बहुत काये लिहिणे हे विज्ञापना.