Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 27.189: [8-7-1757?] Sakharampant to Baburao, advising him to act up to the Peshwa's orders regarding Bundelkhand.

Selections from the Peshwa Daftar 27.189

Language
Marathi

27.189

[seal: श्री]

राजश्रियाविराजित राजमान्य

राजश्री बाबूराव स्वामी गो।

पोष्य सखाराम भगवंत नमस्कार विनंती उपरी. येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लिहिणे विशेष. तुम्ही पत्र पाठविलें ते प्रविष्ट जाले. श्रीमंताचे पत्र आले तेथे आज्ञा कीं मीरखान यास फौजसुधा वोडशास ठेऊन तुम्ही प्रतापसा मिश्र यास घेऊन जलदीने येऊन पोहचणें. त्याजप्रो मीरखान यास ठेऊन

3691 आम्ही दरमजल जात असो व बुंदेलखंडच्या मामलतीचा फडशा होणे त्यास माहितगिरीने निवेदन करावयाचा अर्थ विस्तारे लिहिला तो अवगत जाला. यैश्रास तुम्ही श्रीमंताचे आज्ञेप्रो जांतां ते जाणे. आम्ही या प्रांतीं आहो. प्रसंगानरूप जे करणे ते केले जाईल. राा छ २० सवाल.