Selections from the Peshwa Daftar 27.190: [9-7-1757] Naro Keshav informs Sakharam Bapu that the Rohillas have submitted and that the Vazir has dismissed the Abdali's contingents. He suggests that an attempt be made to intercept these troops marching back to Lahore, and defeat them.
Selections from the Peshwa Daftar 27.190
- Language
- Marathi
27.190
@c श्री
श्रीमंत राजश्री बापू स्वामीजीचे
सेवेसी
सेवक नारो केशव कृतानेक साा नाा विज्ञा उपरी. येथील क्षेम छ २१ सवाल मुकाम बरेली स्वामीचे कृपेकरून कुशल जाणून स्वकीयानंदलेखानाज्ञा केली पाहिजे विशेष. आपण सांभालपत्रे पाठविली ती उ(त)म समई प्रविष्ट होऊन परम समाधान जाहाले. पत्री आज्ञापिले कीं तिकडील वर्तमान वरचेवर लिहीत जाणे. इकडील वर्तमान मामलत फैसल होऊन सुज्यातदौला आपले स्थला गेला. रोहिले सरदार आपले आपले जागा आले. हफीजी छ १६ सवाली मुकाम मजकुरी दाख्ल जाला. दुसरे रोजी भाषण जाले कीं येका दो रोजी करारमदार यैवजाचा तूर्त पाठवणे तो ठीक करून तुम्हासमागमें येक भला माणूस देऊन श्रीमंताकडेस रुकसत करून जाबसाल उरकोन देणे. दिवाण पाहाडसिंगासमागमे दोन हजार फौज देऊन आपणाकडेस पाठवणार आहेत. आपले पत्राची प्रतीक्षा करितात कीं पत्र आलिया सेवेसी लिया पाठऊन त्यास बनले तर दिवाण मजकुरी समागमे घेऊन येऊन * * * * न च्यार रोज फौजेकरतां गुंता * * * * * आणखी येक भला माणूस * * * * न सेवेसी येऊन पोहचतों. जे * * * * सर्व वर्तमान निवेदन होईल * * * * यासी सामील करोन घेवयाचे * * * फौजेविशी यासी लिहावे. हे फौज * * * देतील याच्याहि मनोदये तोच असे. जरकरता यांचे सिष्टकृत्य करणे असिले तर फौज काही न बोलावावी. यानी तर जगहानखान आब(दा)ली वजिरासमागमे होता. त्यास वजीर तों आपणाकडेस आले. आबदालीचे चितास वसवास आला. नित्य वजिराने हपिजासमागमे करोल दिल्हा की याजला दरबाराचे पासी उतरोन पार करोन देणे. येसियासी जाहानखान आठा चौहू रोजीं कूच करोन जाणार. पांच हजार फौज
3692 आहे त्यामध्ये * * * सलडई आबदाली सातसे आहेत. काही दाहा पाच लक्षांची जागा असे जर करतां विच्यारास आल्यासारखे दरबाराचे रोखे दाहापंधरा हजार फौज पाठवून याचे सिष्टकृत्य सहजात होऊन येईल. आपणास वर्तमान कळावे निमित्य लिहिले आहे. फौजेचा आळीसरी (?) पाहाेन योजना कर्तव्य ते करावी. बहुत काये लिहिणे ? कृपा लोभ असो दीजे हे विनंति.