Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 27.191: [16-7-1757] Ragho Lakshman Purandare sends Sakharam Bapu further details of news from the court of Shuja-ud-daula.

Selections from the Peshwa Daftar 27.191

Language
Marathi

27.191

पौ छ २१ जिल्काद

श्रीगजानन

श्रीमंत राजश्री बापूसाहेब

स्वामीचे शेवेसी

सेवक राघो लक्ष्मण कृतानेक सां नमस्कार विनंती. येथील कुशल ता॥ छ २८ माहे सवाल मु॥ लखणऊ स्वामीच्या कृपावलोकनेंकरून यथास्थित असे. स्वानंदलेखन करावयास आज्ञा केली पाहिजे विशेष. येथील तपसीलवार वृत पूर्वी पत्रीं लिा आहे त्याजवरून ध्यानास आलेंच असेल. सांप्रत नवाबानी केवळ विशयावर चित ठेविले म्हणोन बेगमेजीनी बहुत प्रकारें सांगितलें. त्याजवरून तीस आसामी पात्रा दूर केली. च्यार पांच आहेत. त्या माहालांत दाखल केल्या. चार माहालाचा प्रसंग तूर्त राहिलासा आहे व खोजे तमकिल्यास फिरोन समजाऊन न्याबत घ्याविसी जाली. जागीरदाराचा मुलुक जफ्त करून सरकारात ठेवावा, पुढे लोकांचे हिशोब पाहून पुढील देणे, नख्त खजानी पाहून देत जावे येणेप्रो ठरले आहे. पाहावे कैसे करतील. महमद कुलीखान प्रयागास गेले. वरकडहि लोक जाणार. याजपासी राहतां फौज हजार पांच सात राहील. बादबरसात कामकाज लागेल तर बोलावितील. फौज स्वामीनी दोन हजार नबाबाची बोलाविली. त्यास त्याचा जाबसाल अद्याप कांही होत नाहीं. फौज पाठवीत नाहींत यांत गुता नाही. राजश्री गोपाळराव जाजमदूस आले आहेत. दोचौ रोजा नवाबाकडे येतील. ते आल्यावर काय जाबसाल होईल तो शेवेसी लिहून. आम्ही येथे असावे हे कोणास येथे आवश्यक नाहीं. पहिले ग्रहस्त आहेत. मुतसदियास किता याप्रकारें सांगतात कीं याजला निरोपच देवावा. नवाबानी पनासा

Bk Ca 11-25 3693 स्वाराचा रोजमरा करून देतो म्हणोन मान्य केले होतें. परंतु पुण्य वेचणारानी वेचलें कीं त्याजला काशास भारी करितां. त्याजला निरोपच द्यावा. त्याजवरून आतां कांहीं जाबसाल करी— (अपूर्ण)