Selections from the Peshwa Daftar 27.193: [30-7-1757] Ramchandra Ganesh reports to Sakharam Bapu his arrival at Rewari and describes the state of things in the province round about there.
Selections from the Peshwa Daftar 27.193
- Language
- Marathi
27.193
पौ छ १८ जिलकाद
श्री
श्रीमंत राजश्री बापू स्वामी-
चे सेवेसी
पो रामचंद्र गणेश कृतानेक सा। नमस्कार विनती उपरी. येथील कुशल ता॥ छ १३ जिलकाद मुा रेवाडी स्वामीचे कृपावलोकने वर्तमान यथास्तित असे विशेष. आपली स्वारी दिलीस आली म्हणौन वर्तमान कळले. यैश्यास आम्हास काय आज्ञा ते ल्याहावी. श्रीमंतानी श्रीमंत राजश्री बाबा व मानाजी पायगुडे व महिपतराव देखील तोफखाना त्रिंबक खंडेराव व विसाजी केशव व हुजरातची फौज पवार, जगथाप, माने, बोरगे, थोरात मिळोन अडीच हजार याप्रो पुढे रवाना केले. रेवाडीची खंडणी करावी व खालशाचा मुलुक असेल तो जफ्त करावा याजकरिता पुढे रवाना केले. आपण व राजश्री मल्हारबाबा सुभेदार मागाहून गौतमबाई येणार याजमुळे जैपुराजवल राहिले. त्याचे वर्तमान मनोहरपुराजवल आल्याचे आले. रेवाडीस आलो. ज्याप्रो श्रीमंतानी सांगितले त्याप्रो शोध मनास आणिता खालशाचे परगणे रिकामे नाहींत. तमाम जाटाचा आमल आहे. पाच सातप्रो कामदारखान बलोच याजकडे आहेत. त्यास कामदारखान आपलेकडे आला. सोनपत पाणपत परगण्यात नजीबखानाचा पारपत्याकरिता गेला.
3694 न्यास आपले आज्ञेवरून आला असिला तर त्याचे परगणे जफ्त कसे करावे याजकरितां सेवेसी लिहिले व सिताराम खानानची याचे बाईकोकडे दोन तीन परगणे आहेत त्याचा लेक आपलेपासी आला म्हणौन यैकिले. येविसीचा काय मजकूर तो ल्याहावा त्याप्रो वर्तणूक करूं. श्रीमंत मागाहून लौकर येणार. रेवाडीस येक शाहाजादा आला होता तो येथेच लस्करात येऊन राहिला आहे. प्राा दादरी येथे येक शाहाजादा व बहादरखान बलोच दोन हजार फौजनसी आहेत. कळावे वरकड मजकूर (अपूर्ण)
Discussed in (1)
- Fall of the Mughal Empire — Sarkar 1932, English