Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 27.194: [August 1757] The writer describes how Delhi was captured by the Marathas under Raghunathrao.

Selections from the Peshwa Daftar 27.194

Language
Marathi

27.194

शेवेसी विज्ञापना. आम्ही प्रातःकाळींच तयार होऊन आलो. त्याजकडील मोरचे उठऊन कसमिरि दरवाजपावेतो लोक मारीत गेले. तेथे मोरच बसविले आहेत. त्याचा मार वरील व आपल्याकडील मार पोटीं पडला. कुरछीयाचा बाग प्रातःकाळींच घेतला. हाली बेगमचा बाग घेतला. तेथ रेहकले नेऊन लाविले आहेत. कुरछियाचे बागापासी थोर तोफ लाविली आहे, मार देत आहो. याप्रमाणे चहूकडोन जालें पाहिजे. याजकरिता साहेबी तिकडोन तोफ लाऊन मार द्यावा. मोरचे कायैम बसवावे. रात्रौ निघो नये. वरकडासहि ताकीद करावी. इकडे शहरपन्हियाचा आतरा निपट जवळ राहिला आहे. रात्री बनल तिकडोन कार्य करितों. तिकडेहि धावडाव पाहून होईल तेथवर करावें. आम्हीहि निकड केली. नवाब गाजुदीखानास पाठवितो म्हणून आज्ञा आली होती; परंतु आद्याप येत नाही. मधें मातबर मोरचा येक पाहिजे. राा मानाजी पायगुडे आहेत, परंतु थोडी जमियेत आहे; तर नवाबास जलद रवाना केले पाहिजे. आज कामास वेळस न येत; मग कधी येणार? साहेबी ताकीद करावी. राजश्री समसेरबाहादर याजलाहि मानाजी पायगुडे याजपासी पाठवणें. आम्ही रात्री मोरच पाठवीत नाही. तिकडेहि मोरचे कायैम करून राहावे. चहूकडोन निकड जालिया जुंजहि वाटले जाईल. नवाबास मोगलपुरियाकडे जलद रवाना करावे. ⁺शेवेसी श्रुत होय हे विज्ञापना.

[+ पत्र कोणाचें ?]