Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 27.195: [August 1757] Sakharampant congratulates Janardanpant on his success at Sarangpur. This letter should be read after letter No. 196.

Selections from the Peshwa Daftar 27.195

Language
Marathi

27.195

श्री

राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री

जनार्दनपंत स्वामी गोसावी यासी

पो सखाराम भगवंत नमस्कार विनंती उपरी. येथील कुशल जाणून स्वकीये कुशल लिहिले पाहिजे विशेष. तुम्ही पत्र पाठविले ते पावले. सारंगपूर येथील ठाणे फत्ते केलियाचे वर्तमान सविस्तरे लिहिले ते अवगत जाले. यैश्यास तुम्ही ज्या कार्यास लागाल ते कार्य फत्ते कराल हे निशाच आहे. ठाणे फत्ते जाले हे गोष्ट उत्तम जाली. याउपरी शहरचा बदोबस्त उत्तम प्रकारे करावा. नजीबखानाच लेक जाबतेखान ज्वालापुराआलीकड दाहा हजार फौज घेऊन भागीर्थीचे बेटांत आला आहे. त्यास याचे पारपत्य करणे आहे. यैसास आम्ही व राजश्री रेणकोपंत व माणिकराव व निंबाजी खटके मिलोन पारपत्य करितो म्हणौन लिहिलेत, त्यास उत्तम आहे. रोहिल्याचे पारपत्य जे होईल ते करावेच, यात गुंता नाही. (यापुढें कोरी जागा).

Discussed in (1)