Selections from the Peshwa Daftar 27.196: [1-8-1757] Baburao Narsinh reports to Sakharam Bapu the progress of the siege of Sarangpur.
Selections from the Peshwa Daftar 27.196
- Language
- Marathi
27.196
श्री
श्रीमंत राजश्री बापू स्वामी
चे सेवेसी
पोष्य बाबूराऊ नरसिंह कृतानेक सां नमस्कार विनंती उपरी. येथील कुशल छ १९ माहे जिलकाद जाणून स्वकीये कुशल लेखन करीत गेले पाहिजे विशेष. स्वामीची आज्ञा घेऊन स्वार जालो. त्यास राजश्री जनार्दनपंतासमागमे सारंगपुरास आलो. प्रा। मलीपूरचे वर्तमान तर कानगो अद्याप भेटीस आले नाहीत. उदईक येणार आहेत. वर्तमान मनास आणिता कसबियांत चालीस पनास घर आहे. बाकी उज्याड गुजराच्या उपद्रवाकरिता जाले आहे. तेथे जाऊन बसावे तर आपल्या बळे बसावे. सिबंदी फार पाहिजे. परगणियाचे गाव फारकडोन गुजराचे आहेत. काही उज्याड. पाच सात गाव सारंगपुरा आसपास आहेत. खटखटीसी कारण आहे. सुरळीत नाही. बरे. आपण साहेबकार्यास चुकनार नाही. कानगो भेटलियावर सविस्तर लेहून पाठऊ. सारंगपूरचे वर्तमान तर किलियात सेख सरीफ मोगलाचे ठाण आहे. से दोनसे राऊत व पाचसे प्यादे
3696 यैसे आहेत. किला भारी आहे. बाहेर आपल्याकडील मोर्चे लागले आहेत. आमदादखान पाहाडाकडे आहे. त्याची आवाई आहे व आणखी जागा जागा रोहिले व गुजर याची आवाई फारसी आहे. राजश्री जनार्दनपंतीं मोर्चाची तरतूद चांगली केली आहे. मोर्चे येका दो रोजानी जवळ जातील. छबिना राऊताचा भारी करावा लागत आहे. या प्रांती राजश्री विठल सिवदेव व राजश्री अंताजी माणकेश्वर याची फौज असली तर त्यास लेहून तेहि येऊन पोहचले तर उतम आहे. नाही तर हे जोपरियेंत कस्त करावयाची ते करीतच आहेत. सर्व खावंदाच्या प्रतापे होणे ते होईल. वरकड कमाविसदार तमाम आपालाले माहालात सुखरूप गेले. अमल सुरळीत चालत आहे. सारंगपुरापलीकडे व सनिधमात्र आद्याप कोठे बंदोबस्त नाही. येथील ठाणे निघोन गेले म्हणजे याजला दुसरे काम सुचेल. बंदोबस्त करणे तो करतील. बहुत काये लिहिणे हे विज्ञाति. सारंगपूरच्या किलियात सेख सरीफ भांडत आहे. निमित्य कीं, नजीबखान सला करून रुपये देऊन फिरोन मुलूक आपणाकडे करून घेणार म्हणून भरवसा जाणून किलियांत दम धरून आहे. दुसरे शहरच्या वगैरे लोकासहि पुरता भरवसा येत नाही की, आपला आमल सेवटपरियेत राहेल. नजीबखान निदान येईल यैसा फितव्याच्या गोष्टी सांगतात. या प्रकारे वर्तमान आहि हे विज्ञाति.
Discussed in (1)
- Fall of the Mughal Empire — Sarkar 1932, English