Selections from the Peshwa Daftar 27.197: [7-8-1757] Samsher Bahadar informs Sakharam Bapu that as directed steps will be taken to collect dues from the province of Ali Bahadur Baloch when Raghunathrao arrives at Rewari.
Selections from the Peshwa Daftar 27.197
- Language
- Marathi
27.197
पौ छ २४ जिलकाद
राजश्री सखारामपंत बापू
गोसावी यासी
[seal: छ]
सकलगुणांलकरण अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य श्वो समशेरबाहादर सलाम विनंती उपरी. येथील कुशल जाणौन स्वकुशाल लिहीत असिले पाहिजे विशेष. आपण पत्र पाठविले पावून संतोष जाला. लिहिले वृत्त कळले. बलोचाच्या मुलकाची ताकीद करवावी म्हणौन लिहिले. यैशास श्रीमंत राजश्री दादासाहेबांची स्वारी रेवाडीच्या मुकामी असतांच आलीबाहादूरखान बलोचाच्या माहालाची ताकीद होईल. छ २१ जिलकादी झील उतरोन श्रीमंत समेततोफखाना खारवे ता रेवाडी येथे येऊन मुकाम केला. आपली भेट लौकरीच होईल. कळावे राा छ २१ जिलकाद. बहुत काये लिहिणे ? लोभ कीजे हे विनती.
Discussed in (1)
- Fall of the Mughal Empire — Sarkar 1932, English