Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 27.198: [13-8-1757] Devji Takpir informs Sakharam Bapu that as instructed he is guarding Rajghat.

Selections from the Peshwa Daftar 27.198

Language
Marathi

27.198

श्रीशंकर

श्रीमंत राजश्री बापू स्वामी गोसावी यांसी

सेवक देवजी ताकपीर कृतनेक दंडवत विनंती उपरी. काल शुक्रवारी संध्याकाळी राजश्री बाबूराव फडनीस यानी आज्ञा केली जे, तुम्ही गोटसुधा शाहादडियाजवळी जाऊन राहावे आणि राजघाटाची बंदोबस्ती करावी. आम्ही आज्ञाधारक. ते समईं कूच करोन सडेच उभयेता बंधू च्यार घटिका रात्रीं घाटावरी येऊन राहिलों. येथील बदोबस्ती यथाज्ञाने करितों; परंतु येथून लोणीचा घाट आडीच तीन कोस आहे. तो घाट मोकळा आहे. त्याची बंदोबस्ती नाही. येथे तों तुमच्या प्रतापे न्यूनता होणार नाही. नावाडा रोहिल्याच्या स्वाधीन पलायेमान करून जाणार आसला तरी इकडे सामान मातबर असलिया पारपत्य यथास्थित होईल. आम्ही तो आपल्या सामर्थे स्वामिसेवा करोन सुचला पदार्थे विनंती करावी हे खरे. याचा विचार जो कर्तव्य तो करावा. लोणीच्या घाटाची तजवीज करावी. येथून त्या घाटाची बंदोबस्ती आमच्याने कैसी होईल ? पूर्वी राऊत आपण चौकीस येथे पाठविले होते. त्यासी येक होडी गहूं भरोन दिलीस जात होती ते चौकीच्या राऊतानी देखिली. येमुनेंत उड्या घालोन होंडी जबरदस्तीने घाटावरी आणिली. हे वर्तमान काल राजश्री बाबूरायासी सुचऊन तेथून बरकंदाज आणून आजी होडीवरी बसऊन होडी पडपडगंजासी रवाना केली. तेथे गेलिया मालाचा व होडीचा बंदोबस्त करणे तो करावा. आम्ही येथून राजश्री बाबूरायासी चिठी लिहून माणसे पाठविली आहेत. आपणासी कळावे. बहुत काये लिहिणे हे विनंती. श्रावण वद्य १४ शनवार.

3698

Discussed in (1)