Selections from the Peshwa Daftar 27.200: [17-8-1757] Shankraji Mahadev to Raghunathrao, narrating the difficulties created in the province by Sedu Gujar and describing the efforts that the writer made in stopping their activities and capturing their posts.
Selections from the Peshwa Daftar 27.200
- Language
- Marathi
27.200
पौा छ ७ जिल्हेज
श्री
श्रीमंत राजश्री दादा
साहेब स्वामीचे सेवेसी
विज्ञापना सेवक शंकराजी माहादेव साा नमस्कार विज्ञापना. येथील कुशल ताा छ १ जिल्हेज पाा बादड स्वामीचे कृपावलोकनेकरून वर्तमान यथास्थित असे विशेष. साहेबाची आज्ञा घेऊन राजश्री बापूसमागमे आलो. याणी सिकंदराबाद वगैरे च्यार माहाल हवाला केले. प्रस्तुत येथील बंदोबस्त करून श्रीगंगातीरी फरिदाबाद आहे तेथे जाऊन बंदोबस्त करून सिकंदराबाजेस येऊन सेवेसी येऊन सविस्तर वर्तमान निवेदन करू. यानंतर या प्रांती गुजराचा उपद्रव बहुत. त्यास छ ३० जिलकादी सेडू गुजर याचे तुमाऊपूर व मिरपूर या गांवी स्वारी करून तुमाऊपूर जाळून मिरपूरची गढी होती तेथे मोर्चे लाविले. से पनास माणूस गढीत होते. आहोरात्र जुजले. रात्री पलोन गेले. तेथे सरकारचे ठाणे बसविले. गढी पाडून टाकावी तरी फिरोन गुजर गढी बांधोन परगण्यास उपसर्ग देणार. तेथे ठाणे राहिल्यास चहू परगण्याचे मध्यभागी सरकारचे उपयोगी आहे. जागीर खानखानाची डासणा परगणा; परंतु गुजर जबरदस्तीने ठाणे घालून बळाऊन बसला जाणोन मेहनत करून सोडविले, याजविसी साहेबापासी कोणी मतलबी गोष्टी विदित करील तरी या प्रकारचे वर्तमान आहे. ठाणे राहिल्या च्यार पाच परगण्यास उपयोगी आणि याजखाले दाहा गांव सुटले ते सिबंदी खर्चास कार्यास येतील. गावगनाची यादी आलाहिदा पाठविली आहे त्यावरून विदित होईल. डासणा, शाहाणा, सिकंदरा, बारणावद
3699 वगैरे तमाम माहाली गुजर आहेत त्याचे पारपत्य करावे लागेल त्यामुळे सरकारात नालीस होईल जाणौन सेवेसी लि॥ आहे. सेख आणू पा॥ खानपूर पा॥ शाहाणा येथें राहातो. दोनसे राऊत, तीन च्यारसे प्यादे, सामान उतम, मातबर माणूस यास आणून ठेविले. दरमाहा करावा तरी भारी पडतो, याकरितां दोन भाग सरकारचे, तृतीये भाग त्याजला, मवासीचे पारपत्य करून त्यापैकी उत्पन्न होईल. स्वारिसिकारी गुजराचे पारपत्याकरितां केलिया मालपेसबी येईल त्याचा मात्र विभाग त्यास द्यावा. कौली गामचे त्यास प्रयोजन नाही. इतका बखेड़ा करायाचे प्रयोजन नव्हतें परंतु आम्हापासी जमाव आहे तो विदित. जागाजागा स्वार प्यादे ठेविले. समागमे थोडे आहेत. मवासांचे तों पारपत्य केले पाहिजे याकरितां ठेविले. स्वारिसिकारीमुळे सरकारचे काम होऊन त्याचे थोडे बहुत चालेल. त्याचा खर्च तो भारी आहे. परंतु सरकार जोडावे जाणोन राहिला आहे. मासपक्ष बाहेर फिरतो. तो आहेत आंगवर पडे येसें नाहीं. याउपरी जे आज्ञा होईल त्याप्रमाणे वर्तणूक करूं. आम्ही इकडील कामकाज मनास आणून सेवेसी सत्वरीच येतो. विदित होय हे विज्ञप्ति