Selections from the Peshwa Daftar 27.201: [17-8-1757] Sadashiv Khanderao informs Sakharam Bapu that Renakopant instead of capturing Haidarnagar as directed, proceeded to Haridwar. The writer therefore requests the addressee to make arrangements to capture it and thus make it easy to collect dues from the province.
Selections from the Peshwa Daftar 27.201
- Language
- Marathi
27.201
पौ छ ५ जिलहेज
श्री
श्रीमंत राजश्री बापू स्वामींचे
सेवेसी.
पोष्य सदाशिव खंडेराव साष्टांग नमस्कार विनंती. येथील कुशल ता॥ छ १ माहे जिलहेज पावेतो मु॥ कसबे बघरा जाणून स्वकीये कुशल लिहीत असावे विशेष. प्रगणे मजकुरी हैदरनगर गढी आहे. त्यात ठाणे बाहादरखान बिलोच्याचे आहे म्हणून लिहिले होते. त्याजवरून साहेबी लिहिले की राजश्री रेनकोपंत यास प्रगणे मजकूरचे बंदोबस्ताविसी सांगीतल आहे, हे येऊन बंदोबस्त करून देतील. त्यास राजश्री रेनकोपंत सरंजामसुधा येऊन दोन रोज मुकाम केले, परंतु त्याच्यानी हैदरनगर येथील ठाणे बाहादरखान बिलोच याचे ठाणे उठोन न लावले. निघोन हरिद्वारास गेले. ठाणे मजकुराखालीं तीन गाव बद़ले आहेत. त्याचे जमीदार आम्हास रुजू होऊ देत नाही आणि आम्हासी तो जाबसाला करितो की ठाणे
3700 मजकूरची सनद आणून देतो. तर जोपर्यंत प्रगणे मजकूर येथे बिलोचे मजकुरा(चे) ठाणे आहे तोपर्यंत गावगणा येथील जमीदार वसूल सुरळीतपन देत नाही तर साहेबी काये ती आज्ञा केली पाहिजे. राजश्री जनार्दनराम यासहि पत्र पाठविले होते ते त्याजकडे कासिदाबरोबर पाठविले. त्याणीहि उत्तर पाठविले जे तूर्त यावयास आनकूल पडत नाही. राजश्री रेनकोपंत नव्हते आले तेव्हा त्याजपासी सिबंदी प्यादे शंभर होते. त्यासहि आमचा दबावहि होता. फौज येणार यस त्याजला पुरते कळल होते की फौज आल्यावर आपले पारपत्ये होऊन येईल. त्यास फौजच्यान तो काही पारपत्ये जाहाले नाही. आलीकडे त्याणे सिबंदी तीन चारसे प्यादे ठेविले आहेत. आम्हापासून येका कोसावर गडी आहे. हा येथून जात नाही तर आमचा येथे टिकावा होत नाही. आम्ही वरचेवर लिहितो म्हणून स्वामीस वाईट वाटत असेल तर आम्ही सुख लिहीत नाही. दुख करून लिहीत आहो. राजश्री रेनकोपंती हेदरगडवाल्यापासून घासदाणा रुपये १२५ सवासे घेतले. स्वामीस कळावे म्हणून लिहिल आसे. सेवेसी श्रुत होये हे विज्ञापना.