Selections from the Peshwa Daftar 27.202: [25-8-1757] Gopalrao Ganesh informs Sakharam Bapu that as instructed by Raghunathrao he is trying to put off his own departure and also that of Shuja-ud-daula from Jajmau until he (Raghunathrao) arrives at Delhi. The writer further says that he will utilise the intervening time in capturing some minor posts.
Selections from the Peshwa Daftar 27.202
- Language
- Marathi
27.202
श्री
श्रीमंत राजश्री बापू स्वामींचे
सेवेसी
पोष्ये गोपाळराव गणेश कृतानेक सां। विनंती उपरी. येथील कुशल ता॥ छ ९ माहे जिल्हेज मुकाम जाजमऊ आपले कृपेकरून यथास्थित जाणून स्वकीये कुशललेखन करीत गेले पाहिजे विशेष. स्वामीकडील वर्तमान सांप्रत कळत नाही तेणेकरून चित सोद्विग्न आहे. तरी कृपा करून लिहिले पाहिजे. आम्हाकडील वर्तमान पूर्वी छ ५ रोजी मुजरत जोडी आपल्याकडे पाठविली त्याजबरोबर सविस्तर वर्तमान लिहिले आसे त्याजवरून विदित होईल. नबाब सुजातदोला आपणाकडे यावयासी सिध जाला असे. त्यास सांप्रत श्रीमंत राजश्री दादासाहेबांचे पत्र आले; त्यांत मजकूर कीं प्रस्तुत घेऊन न येणे. च्यार दिवस जाबसालावरी घालोन दिवस काढणे तो आम्ही दिल्लीस गेलियानंतर तुम्हास लेहू
Bk Ca 11-26
3701 त्याप्रमाणे कार्य करणे. त्यास नबाबाने तो करार केला आहे. पुढे अलिबेगखानास रवाना करून मागाहून आम्ही कूच करितों त्याप्रा करार करून आम्ही निघोन मुकाममजकुरी आलो तो मागून अलिबेगखान कूच करून मोहनेस आला. दो चव रोजानी येथे येतील. आमची त्यांची भेटी जालियांनंतर दिलीकडे येईल. नबाबास आम्ही विचाराखाले घालोन च्यार दिवस लांबणीखाले घालितो यैसे करिता आलाच तरी घेऊन येऊं. आम्हीहि जाजमऊ परगणीयात नव्या दाहा वीस गढ्या बदल्या आहेत त्याचे पारपत्य करितो आणि दसरा जालियानंतर सत्वरीच स्वार होऊन सेवेसी येतो. श्रीमंतानी आज्ञापत्र पाठविले की रसद इकडे देणे, पुण्यास न देणे, त्यावरून तरतूद करून काही भरणा पाठवितो; मागाहून मी येतो. पण यंदा हंगामामुळे सरकारात तीन लाख रुपये फाजील आहेत व राजश्री अंताजीपंत नानास रुपये दिल्हें ते मजुरा यंदाचे सालात आले पाहिजेत व सेवकाचे पतकाची पागेची नालबंदी पाहिजे यैसे आहे; सेवेसी लिहा असे. आज्ञ करणार आपण आहेत. तपसी(ल)च लिहा म्हणून रागे भराल म्हणून काही ऐवजहि पाठवितो; मग काये आज्ञा करावयाची ते करावी. सेवेसी श्रुत होये हे विज्ञापना.