Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 27.203: [8-9-1757] Gopalrao Ganesh informs Mahipatrao Chitnis that Alibegkhan has already been sent to Raghunathrao and soon he will also follow suit.

Selections from the Peshwa Daftar 27.203

Language
Marathi

27.203

श्री

राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री

महिपतरावजी गोसावी यासी

स्नेहअभिलासी गोपालराव गणेश कृतानेक आसीर्वाद विनंती उपरी. येथील ता॥ छ २३ जिल्हेज स्वकीये कुशल लेखन करीत गेले पाहिजे विशेष. सांप्रत आपल्याकडील पत्र येऊन वर्तमान कलत नाही तरी निरंतर पत्री आपले वृत्त लेखन तोषवीत जावे. आमचे वर्तमान तरी पूर्वी लखनऊचे मुकामीहून पत्र लिहिले आहे त्याजवरून विदित जाले असेल. नवाब सुजातदौलाची भेटी जालियावरी आलीबेगखान दिलीस श्रीमंताकडे रवाना केला. आम्ही निरोप घेऊन माहालात आलो. येथील बंदोबस्त आठा पंधरा दिवसी करून दिलीस श्रीमंताचे सेवेसी जातो. दरबारी सर्व प्रकारे आपला भरोसा. कळेल त्या रीतीने साहित्य करावे. वारंवार लिहिणे नलगे. बहुत काये लिहा. कृपा कीजे हे विनंती.