Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 27.204: [22-9-1757] Trimbak Krishna and Janardan Ram inform the Peshwa that order has been restored and the Peshwa's supremacy established in the Doab. Janardan Ram was serving Gangadhar Bajirao Retrekar.

Selections from the Peshwa Daftar 27.204

Language
Marathi

27.204

श्रीमंत राजश्री नाना

स्वामीचे सेवेसी

विनंती सेवक त्र्यंबक कृष्ण व जनार्दन राम नि॥ गंगाधर बाजीराव कृतानेक सां नमस्कार विज्ञापना. ता॥ छ ७ मोहरम मु॥ अहीखा पा॥ मईनपुरी प्रांत अंतरवेद स्वामीच्या कृपावलोकने वर्तमान यथास्थित असे विशेष. अंतरवेदींत आल्यावर सविस्तर वर्तमान पूर्वी शेवेसी विनंती लिहिली आहे त्यावरूत विदित जाले असेल. सांप्रत आजपर्यंत अंतरवेदीतील दोन तीनशे गढी मवासी हस्तगत जाली; त्यामध्ये काही सरकारी ठाणी ठेविली, काही पाडून टाकिल्या. याप्रमाणे अमल सुरळीत स्वामीच्या प्रतापे अंतरवेदीत होत आहे. फारकरून अमल सुरळीत जाला. काही राहिला आहे तोहि थोड्याक्यान दिवसांत सुरळीत होईल. विदित असावे. येविसीचा सविस्तर अर्थ राजश्री गोविंद बलाल शेवेसी लिहीत असतील त्यावरून विदित असेल. पथकातील अर्थ आजपर्यंत शंभर माणूस जखमी व मयत वीस पंचवीस याप्रो वर्तमान. पर्जन्यकाल फिरती छावणी लोकास मेहनत भारी पडली. पुण्यांत समजावीस भारी निघाली त्यामुळे नालबंदी कमी पावली. स्वारीत रोजमरा झाडून पावला याजमुळे आदा थोडा जाला. बाकी फार निघत्ये. नेमणूक छावणीस रवानगी जाली ते समई कोती जाली. येविसीचा सविस्तर अर्थ पूर्वपत्रीं विनंती लिहिलीच आहे त्यावरून ज्याजती येवजाची सनद गोविंदपंतास रवाना झालीच असेल. हालीहि विनंती ज्याजती येवज सनद पाठविली पाहिजे म्हणजे लोकांची स्थित राहील. सर्व अर्थ शेवेसी विदित आहे. शेवेसी विदित असावे हे विज्ञापना.

[+ रेठरेकर (?)]