Selections from the Peshwa Daftar 27.205: [About 5-12-1756] Antaji Mankeshwar to the Peshwa, giving in detail the honours conferred upon him by the Emperor and asking for the Peshwa's permission to accept them.
Selections from the Peshwa Daftar 27.205
- Language
- Marathi
27.205
हौते करावा. चितास येईल त्यास ठेवावे चितास येईल त्यास दूर करावे इतके पातशाहाच्या चितापासून आहे. बापूजी माहादेव यांनीहि पातशाहा बहुत प्रकारें राजी राखोन स्वामीच्या लगामी ठेविला आहे. यांचीहि द्रिष्ट स्वामीकार्यावरीच आहे. दुसरे जाणत नाही. मुख्य पठाणावरि लाहोरास वजीर पांचा सातां दिवसीं निघतात (त्या) जबराबर आम्ही हजीर आहों. हे चाकरी त्यांची कीं ज्यापासी पंचवीस तीस हजार फौज असावी, परंतु स्वामीच्या शेवकानें आपल्या जिवाचा संकल्प करून मान्य केली आणि फौजहि पांच सात हजार स्वामीच्या नांवाप्राप्त जमा करितो. केवल कुंगारपणें राहणार नाहीं. छ १० रबिलोवली पातशाहा वजीर यांची आज्ञा आली कीं मुलाजमत करणें. त्यावरून आधी वजिराच्या घरास गेलो. वजिरानी ताजीम घेऊन बहुत सन्मान केला, मग पातशाहाजवळ नेले. मुलाजमत जाली. पातशाहानी बहुतसी कृपा केली कीं तुम्ही माझे विश्वासुक चाकर. बालाजीराऊ आमचे बंधु. मजमध्यें व बालाजीराऊ यामध्यें दोन न जाणावें यैसी आज्ञा केली. ती मस्तकीं वंदिली. मग पंचहजारी मनसबदार करून परवाना करविला. साहेबनौबत व अलंमनकारा दिल्हा. हती, घोडा, समसे, सिरपेंच, कलगी, वस्त्रें दिल्ही. साहेबनौबत सर्व सरंजामसुधा सरकारांतून दिल्ही व अलंमनकारा दिल्हा. त्यासमईं आम्ही अर्ज केला की हजरत, आम्ही बालाजीरायांचे बारगीर. हजरतनी कृपा करून साहेबनौबत अलंमनकारा पंचहजारी मनसबदार केलें. त्यास जागीर असलियाखेरीज काय करावे. मजला श्रीमंतच नौबत देतील तेव्हां जागीरहि देवितो म्हणऊन आज्ञा केली व साहेबनौबत व मरातिब आणखी दिल्हे. जे मी दिल्हे तेंच बालाजीरायानी दिल्हें. मी व बालाजीराऊ दोन नाही. यैसी आज्ञा केली तेव्हां मस्तकीं वंदून आणिली. पांच रोज रुबरू वाजवावयाचा हुकूम केला. त्याचे आज्ञेप्रमाणें वर्तणूक केली; परंतु आम्ही सरकारचे बारगीर, यकवेल आग्रह केलाच होता; परंतु त्यांनी मागती वकिलादेखतां दुराग्रह करून दिल्ही. याची आज्ञा येईल त्याप्रमाणे वर्तणूक करून. स्वामीची सनद सादर जाली तरी नौबत बाजेल. नाहीतरी पांच रोज पातशाहाच्या हुकुमाप्रमाणे वाजली. पुढें जैसी आज्ञा येईल त्याप्रमाणें वर्तणूक करून. आज्ञाधारक चाकर आहों. आपले चाकरीची तरीफ आपणच लिहावी तरी वेडेपण तूर्तच पदरास येत आहे; परंतु यंदा आपल्या जिवाहून अधिकच चाकरी करून कर्जदार होऊन स्वामीचा लौकिकं जैसा म्हणावा तैसा राखिला आणि पुढें पठाणावरि लाहोरास चालोन सपाजंगाचे लढाईसहि
[+ पत्र अंताजी माणकेश्वर यांचें.]
3704 सिद्ध आहों यामुळे पातशाहा वजीर लगामी आहेत. जर कुंगारपणे राहिलों तरी कळतच आहे. पातशाहानी मनसबा आणि जागीर दिल्ही अथवा हरयेक दिल्हे तरी आम्ही बारगीर. स्वामी ठेवितील तैसे राहूं. दिल्लीस दर स्वारा दरमाहे रोजमरा रु० २५ पंचवीस लागतो. सरकारची नेमणूक तरी दर स्वारास दरमाहे रुपये १२ बाराप्रमाणे नेमून दिल्हा. आम्ही सरदारास विनंती (के)ली. कीं दिल्लींत दर स्वारास निवल च्यारसे रु० बरसास पुर (अपूर्ण)