Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 27.206: [27-12-1756] Krishnaji Keshav reports to Sakharam Bapu having captured Jalesar from the Jats.

Selections from the Peshwa Daftar 27.206

Language
Marathi

27.206

पौं छ ७ रबिलावल

श्रीगजानन

श्रीमंत राजश्री बापूसाहेब

स्वामीचे सेवेसी

विनंती सेवक कृष्णाजी केशव साष्टांग नमस्कार विनती. येथील कुशल ता छ ५ रबिलाखर मु॥ कसबे जलेसर प्रांत आंतरवेद, स्वामीच्या कृपेकरून सेवकाचे वर्तमान यथास्थित असे विशेष. या प्रांतीं आलियावर सेवेसी दोन तीन पत्रे पाठविली त्यावरून सर्व श्रुत जाले असेल. काल रविवारी मुकाम मजकुरास आलो. ठाणे जाटाचे होते ते येताच खाले करविले. निशाण स्वामीचे चढविले. वाटेने येतां दताकडील मेवाती स्वार पन्नास पाऊणसे कहीवर आले ते निमुद होतांच स्वारी केली, वीस पंचेवीस स्वार मारून घोडी लोकांनीं आणली. कांही पलोन जवळपास ठाणी होती त्यात गेले. स्वामीच्या प्रतापे सर्वांचे पारपत्य होईल. पूर्वी धाकटी अकबराबाद घेतली याविशईं विनंती लिहिलींच होती. हालीं विनंतीपत्र पावतांच कृपा करून दोनी माहालांच्या सनदा पाठवाव्या. खर्चायासहि मागाहून हुंडी करून सेवेसी पावत्या करितो. कार्यानिमित्य पंधरा दिवस लाग लागोन ठेविला होता तेव्हा सत्वर कार्य होऊन आले. पुढे आणिंक कित्येक कार्यांचे सूचनेत आहो. स्वामीचा आज्ञेचा मार्ग लक्षितो. सर्व स्वामीच्या प्रतापे होऊन येईल. सेवक पदरचा उमेदवार आहे की सेवा करून ऊर्जित करणार स्वामी समर्थ आहेत हे विज्ञाप्ति.

[१ छ ५ रबिलाखरचें पत्र छ ७ रबिलावली मिळणें शक्य नाहीं; तेव्हां पैवस्ती ७ रबिलाखर पाहिजे.]