Selections from the Peshwa Daftar 27.207: [18-12-1757?] Vishwasrao Lakshman writes to Sakharam Bapu that the Vazir on learning that a Maratha army was advancing upon Delhi left the place and fled beyond the Ganges. The writer says he would meet the addressee immediately after restoring order in his district of Shapur.
Selections from the Peshwa Daftar 27.207
- Language
- Marathi
27.207
श्रीशंकर
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री
सखारामपंत बापू स्वामींचे सेवेसी
पोष्च विस्वासराव लक्ष्मण कृतानेक सा॥ नमस्कार विनंती उपरी. येथील क्षेम ता॥ मार्गशीर्ष शुद्ध ८ जाणौन स्वकीये कुशल लेखनाज्ञा करीत गेले पाहिजे विशेष. यैलीकडे पत्र येऊन वर्तमान कळत नाहीं, येणेकरिता चित सापेक्ष आहे; तरी निरंतर पत्रामृते तोषवीत असावे. यानंतर आपले येणे दिल्लीस सार्वभौमाकडे पुढें जाले. श्रीमंत रो दादासाहेब जयेनगर प्रांते आले म्हणून यैकून संतोषाच्या कोटी जाहाल्या. वजीर आपल्या आगमनाच्या आवाईनेंच दहशत खाऊन भयाभीत होऊन बुनगे व निसबतीचे लोकांचे कबिले बराबर कतवाँर फार होते फौज पंधरा वीस हजार होती, परंतु बहुतच जलद दाहा बारा कोसाच्या मोठाल्या मजली करून दरकूच मथुरेवरून आंतर्वेदीतून इटावाियाचे रस्त्याने सरकारची जागा सिकंदरा * * या दोनी माहाल रो गोविंदपंताकडील व आम्हाकडील पा॥ शापूर वगैरे या मार्ग जाजमऊच्या घाटे गंगा उतरावयासी आला. तीन चार मोकाम करून सर्व सांभाळून तोफखानासमेत गंगापार उतरोन गेला. बळवंतसिंग कासीचा राजा याजवरी जाऊन त्याजपासून पैका पेसजीचा मातबर येणें तो घ्यावा या मनसबेंत आहे. बातमी सेवेसी कळावी म्हणौन लि॥ असे. पायेमलींत आंतर्वेदीतील आमची नि॥ जागां तीन मोकाम जाले यामुलें फार खराबी जाली. खरीब लुटले गेले. रबी पायेमलींत आली यामुळे नुकसान जालें. जुंजरुसीस शाहणे माणूस गांव व गाव पाठविले आहेत ते पाहून आलेवरी रयेतीचे समाधान करावयाचे ते करून पुन: आबादी करूं. आकल्पित विघ्न आले त्यास उपाये नाहीं. वरकड या प्रांतीचे वर्तमान यथास्थित असे. श्रीमंती पुण्याहून कृपाळू होऊन सनदा व सिरपाव व सुदामदप्रा॥ बहुमान चौकडा तीर्थस्वरूप रो नारोपंत नाना यांच्या विद्यमाने पाठविला तो पावून मस्तकी वंदोन सनाथ जालों. आमची निरवणूक तीर्थरूपीं सर्व श्रीमंताचे चरणासी केली आहे तेच कृपापूर्वक पाळण करितील. सर्व प्रकारें आश्रये श्रीमंताचे चरणाचा आहे. सांप्रत आपले आगमन या प्रांते जाले आहे. आम्हावरी ममता धरून वडीलपणे सांभाळ करावयासी आविस्मर असावे. कितेक वर्तमान रो रामभटजी सेवेसी निवेदितील त्याजवरून विदित होईल. रो रंगरावयासी श्रीमंत रो दादासाहेबाची आज्ञेपत्रे येक दोन वेळा आली त्याजवरून निकडीचा
[१ सामान व बुणगे.]
३706 आज्ञासंकेत जाणून दो चौ रोजा स्वार होऊन दरमजल त्या प्रांते येत आसेत. दर्शनांती सविस्तर निवेदिंतील. खरिफ़ाचा हंगाम जागजागां मामलतीचा बंदबस्त आंतर्वेदसुधा करून आपले येणे संनिध जालिया आज्ञेप्र॥ दर्शनास येऊं. सदैव स्वामीच्या दर्शनाचा हेतू लागला आहे. योग घडोन येईल तो सुदीन. आम्हायोग्य काम व रिजेचा आर्थ लिहावा तेणेंप्र॥ चाकरीस आंतर होणार नाहीं. आम्ही आपले पदरींचे आसो. विस्तरे विनंती काये लिहावी. आश्रई भूतांचे पाळग्रहण करून ऊर्जित करणार आपण आहेत. सदैव कुशलार्थ लिहून संतोषवीत असावे. आम्ही आपले पदरचे असो. कृपालोभ असों दीचे हे विनंती.
सेवसी राघो पुरुषोतम कृतानेक सां नमस्कार विनंती. लि॥ परिसोन चिरंजीव रो॥ रावजीवरी कृपा करीत आसावी. सर्व प्रकारें पदरींचे आसो. कृपा लोभ आसो दीजे हे विनंती.