Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 27.208: [1757?] Antaji Mankeshwar writes that Raja Nagar was unwilling that affairs should be conducted in defiance of the wishes of the Vazir his master, but had been prevailed upon to stay, being assured that all would be put right after the capture of the posts held by their common foe, Najib Khan.

Selections from the Peshwa Daftar 27.208

Language
Marathi

27.208

श्री

सेवेसीं विनती उपरी. काली आम्ही तीन कोस पुढे आलो. आजी खानपुराबरी जातो. आजी स्वामीची आमची तफावत पाच सात कोस पडेल. रा। जनार्दन रामास वरचेवरी ल्याहावें कीं मेरठचे ठाणे कायेम होये तोवरी अंताजीपंताजवळ राहावे. जरूर ल्याहावे. रा। मुरारपंत व त्रिंबकपंतास सत्वर पाठवणे. राजे नागर यानी वकील आपला पाठविला की आम्हास निरोप देवणे आपण जातो. तुम्ही मुलुकाची जपत्ती करिता, आमची सल्ला नाही. वजिराची सल्ला नाही. जेव्हा वजिराच्या आमच्या इतल्याखेरीज कारभार जाला तेव्हा आम्ही काशास राहावे ? तेव्हा बहुता प्रकारे समाधान करून लिहिले व सांगितले की तूर्त आमचा तुमचा वैरी नजीबखान आहे. त्याने सर्व जागा दाबिली आहे. त्या जागियास खाली करून सरकारचा आमल करून मग वजीर आलियाउपरी तुमचे विचारे जैसे करणे तैसे करून. वजिराची सोये करून तुमच्या पोटाची सोये करून. आम्ही आपली करून जैसे बहुता प्रकारे सांगितलेच आहे. स्वामींनीहि बहुत समाधान करून जाऊ न द्यावे. येक दिवस त्याचे डेरियास जरूर जावें. बहुमान जरूर राखावा. रूपराम कटाराहि निरोपास येईल त्याजबा कारकून दिल्हा आहे. त्यास जी कलमे त्याजकडे आहेत ती सर्व राा तात्यासी रुजू करून दिल्ही आहेत. दफ्तरी यादी आहे. स्वामीनी त्यास सांगावे. वरकड जे सांगणे ते सांगावे. बालाजी गोविंदास काहीतन्ही फौज देऊन वाटे लावावे म्हणजे त्याची उबरी राहील; नाहीतरी माणूसपण राहत नाही. जरूर थोडी बहुत तन्ही द्यावी. त्रिंबकराऊ, धोंडोपंत यांसहि दोन महिने राहावयाचे करावे. बालाजीपंताची त्याची गाठ घालून द्यावी. बहुत काये लिहिणे हे विनंती.

[+ पत्र अंताजी माणकेश्वराचें.]