Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 27.209: [December 1757 ?] Vasudev Dikshit proposes to Raghunathrao to come to Benares and protect the city and its ruler Balavantsing whom he reports to be entirely loyal to the Peshwa. Dikshit reports that the Vazir was trying to take possession of Benares, which the Peshwa must prevent on the ground of religion. (Balavants

Selections from the Peshwa Daftar 27.209

Language
Marathi

27.209

श्री

श्रीमंत राजश्री रघुनाथपंत

दादा यांप्रति

श्रीवाराणशीहून वासुदेव दीक्षित अशीर्वाद उपरी. येथील क्षेम जाणोन स्वकिये कुशल लीहावयाशि आज्ञा केली पाहीजे विशेष. राजश्री राजे बलीवंड सींह यानी श्रीक्षेत्राचें पालन पंधरा वर्षे जसें केलें ऐसें मागें कोणी न केलें. पुढेंही होईल. त्यास हे स्थळ तुम्हाकडे वजीरानें परवाणें करून दिल्हे. राजास लिहीत असे. वरचेवर पंचवीस पत्रें दाखविलीं जे अमल न देणें. त्यामध्यें यांचा किमपि अन्याय नाहीं. त्याचें लीहीलें न करी तर प्रस्तुत याजवरच दंगा करणार. यामुळे अमल न दिल्हा. परंतु यांस सांगीतले जे तुम्हीं युक्तीयुक्तिचा वाटेनें सर्व होईल. त्यास त्यांजकडुनहि ही उतावळी जाहाली. बरें जे बरें वाईट जाहालें तें आपण क्षमा करावी. तेथील स्थळाचें संरक्षण करावें. यामध्यें तुम्हासही यश आहे. आतां वजीर या प्रांतास येतो प्रयागी घरोघर चौक्या लहान थोर यांचा येथे बसडन लुट आरंभीली आहे. या स्थळावर मोटा दांत आहे. ती राजाचा चिंतांत जे आजपर्यंत हें स्थळ रक्षण केले. आतां काय उपाय करावा? लोक सर्व भयाभित आहेत. येथे येक गंगा प्रार्थनवी. दुसरा उपाय नाही तर तुमचें येथें सत्वर याच्या मागुन येणे होईल तर बरें. नाहींतर

[+ सर्वच पत्र बालबोधति.]

3708 दाहा पंधर सहस्त्र स्वार व येक सरदार पत्रदर्शनें पाठउन देणें. ते नजीक आले म्हणजे राजासही पांच सात हजार स्वार घेउन तुम्हास सामील होतील. यांची तुमची भेटी जाहालीयावर जी आज्ञा कराल त्यास हे सीघ्र आहेत परंतु हें स्थळाचें रक्षण करावें. राजाचेंही रक्षण करावें. दीगांतरी आपली कीर्ति होईल. येथील लोकांस कोठे जावयास स्थळ नाहीं. कदाश्चित उपद्रव जाहाला तर लेंकरेबाळे घेऊन गंगाप्रवेश करितिल. दुसरा उपाय नाहीं. राजाची बरी वाइत कीतीक गोष्टि तुम्हास कोणी सांगतील व सांगीतल्या असती तर चित्तामध्यें न आणान्वें. हा अनन्यभावें आपले पायांची जोडी इच्छीतो. त्यांचें आमचें सभाषण जाहालें. त्यास यास हाती धरील्याने पुढेही बहुत कार्याचा आहे. शतां पत्री ठांईं हे पत्र लीहीले आहे तर सत्वर आपले येणे हाइल तर उत्तम. नाहींतर पत्रदर्शने फौज रवाणा करणे. पुढें उत्तर या पत्राचें पाठवणे. जेथें म्हणाल तेथें हे येऊन सामील होतील. राजश्री मल्हारजीचा चितांत विक्षेप बहुत आहे. ते तुम्हास सांगतील तर हा समय विक्षेपाचा नाहीं हो. तुह्माकडेच येतील तेव्हां जें होणें तें होइल. राजाहीं आपली अर्जी पाठविली आहे त्याजवरून कळेल. सुज्ञाप्रति बहुत काय लिहीणें हे आशिर्वाद.