Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 27.210: [1757] Vithal Shivdev writes to Sakharam Bapu that moneys to the amount of fifty thousand rupees are due from Ruparam Katare who should be made to pay them immediately.

Selections from the Peshwa Daftar 27.210

Language
Marathi

27.210

श्री

पु॥ राजश्री बापू स्वामीचे सेवेसी.

विनंती उपरी. आम्हीं स्वामीचे आज्ञेप्रों दरकूच पुढें गेलों. आपण रुपराम कटारे यांस निरोप देतील. यैशास रुपरामाचा आमचा भाऊपणा स्नेह आहे. त्यांकडे आमचीं कामें बहुत आहेत, ते स्वामीस सांगत नाही व सांगतां येत नाही, ते आम्ही समजोन घेऊन; व दिढा लाखाचा हवाला व पेशजीची बाकी आमची येणे त्याविसीहि स्वामीस विनंती करीत नाही, ते आम्ही समजोन घेऊन. परंतु येते समईं स्वामीस विनंती केलीच आहे कीं पा॥ जलालीचा वसूल निव्वळ रुपये २६५०० साडे सवीस हजार घेतले आहेत ते त्यांसीं रुजू केले आहेत ते आपणास मजुरा घ्यावे. याखेरीज हतीबा पंधरा हजार रु॥ व जैनगरबाबत

Bk Ca 11-27 दाहा हजार येकून पंचवीस हजार रु॥ बलेंच घेऊन बसला आहे. येकूण साडे येकावन हजार रु॥ रुपरामाकडे तूर्त येणे. त्यास आपण त्याचे भिडेने हा जाबसाल ठेऊन निरोप देतील तरी सदरहू रु॥ सरकारातून आम्ही मजुरा घेऊं. किरकोळी कामे स्वामीस सांगतां येत नाहींत व सांगत नाही परंतु दो कलमांची विनंती केलीच आहे. परिछिन सरकारचे रुपये बुडतील याकरितां रु॥ बेमुरवत रुपरामापासून घ्यावे. योंचा जाबसाल काही घालमेलीचा नाही. यैसेकरितां समागमे आसिला तरी गुता नाहीं. गोहदकराविषयी काही श्रीमंत दादास आपण रुपरामाचे भिडेने न ल्याहावे हे विनंती.