Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 27.211: [1757 ?] Gangadhar Yeshwant to Raghunathrao, expressing his utmost willingness to carry out the latter's orders.

Selections from the Peshwa Daftar 27.211

Language
Marathi

27.211

श्रीम मोरया

शेवेसी विज्ञापना. स्वामीनी रविवारचे पत्र पाठविले ते पावले व सोमवारचेहि पत्र मंगळवारी पावले. यैसियासी आम्ही आज्ञांकित सेवक. आज्ञेखेरीज नाही. सारांस गोष्टी स्वामीनी पृथ्वीवलयांकित यश संपादिले ते जतन करून सर्वानी संतोषे खावंदाचे पाये पाहावे म्हणिजे उतम गोष्टी आहे. राजश्री सुभेदार साहेब स्वामीचे आज्ञेखेरीज नाहीत. सर्व विस्तार राजश्री सखारामपंत बापूनी लि॥ आहे त्यावरून विदित होईल. दिवस संनिध आले. उपयोगी मनसबा करणे. स्वामी समर्थ आहेत. शेवेसी श्रुत होये हे विज्ञाप्ति.