Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 27.212: [About July 1757] Raghunathrao makes inquiries about Malharrao Halkar's health and describes him his activities in Orcha and Datia.

Selections from the Peshwa Daftar 27.212

Language
Marathi

27.212

श्रीसांब

मॅल्हारजी होळकर यास पत्र की तुम्हास बरे वाटत (नाही) हें वारंवार ऐकोन चितांस वारंवार दुःख होते यास्तव आपणास पाहावयास रंग जोसी, बापूभट पुराणिक पाठविले आहेत. आपण सत्वर आलियावरी बहुत उपयोग आहेत. आम्हीच येणार होतो परंतु ओडसे दतिये येथील खंडणी तुम्हींच केली होती तिचे

[१ पत्र विठ्ठल शिवदेवांचें असून यापुढील मजकूर खुद्द त्याचे हातचा आहे. २ पत्र राघोबाचें.]

3710 वमुलास गुंतलो. सेवटी वसूलहि न जाहाला. च्यार हती, घोडे, जबाहिर, सोने, रुपे ऐसे मात्र पाऊण लक्षाचे घेतले. पंचवीस हजाराची सेव्याची निशा केली आहे. येतील तेव्हा खरे. दतियाकडील थोडा बहुत वसूल येणार येईल तेव्हा खरे. आपणास कळावे. येणे प्राा पत्र देणे.