Selections from the Peshwa Daftar 27.213: [About July 1757] The writer refers to the negotiations started with the Raja of Orcha.
Selections from the Peshwa Daftar 27.213
- Language
- Marathi
27.213
श्री
सेवेसी विज्ञापना. राजश्री विठ्ठलराव सिवदेव यांची चिठी आली तीच बजिनस सेवेसी पाठविली असे. व वोडशाहून राज्याकडून मुहूर्तांचे पत्र आले आहे तेहि पाठविले असे त्यावरून ध्यानास येईल. सारांश आजच राज्याने येणे; गुता नव्हतासा वाटत होते, परंतु मुहूर्तामुळेच आज येणे राहिले. उदैक येतील. उद्याचा दिवस मुकाम करणे प्राप्त जाले. वोडसेवाले जोतिष्याचे रीतीने रदबदली करितात म्हणोन आजच वोढता न ये; कळावे. सिधाचा सेटीचा कारकून आला तोहि रवाना केला आहे. स्वामीचे प्रतापे सर्व यथास्थित घडोान येईल. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना.