Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 27.214: [1770] The letter reports affairs in the Doab and advises that an expedition be dispatched against the Rohillas.

Selections from the Peshwa Daftar 27.214

Language
Marathi

27.214

(पहिला बंद गाहाळ)

करावा. दाहा लाख रुा। घ्यावे. इतके आल्याने काही काम होईल व रोहिले गंगापार याजवरहि दबाव बसेल असे समजोान करावयाचे केले. त्यास किसनसिंग येथून गेला. त्यास दिवसगत लागली. आणखी सरदारांकडे येक येक वकील बोलतच आहे. त्यात परस्परे उभयेपक्षी सर्वांचे मते आपल्या हातून व्हावे ही इच्छा जाणून किसनसिंग लबाड याचे हातून सिधीस जात नाही असे निश्चयांत आले. इतकियात तो डिगेहून निघोन मथुरेस आला. पत्रहि आले. बरोबर भगवंतराव सरकारचा वकील आला; परंतु याणेहि परिणाम नाही असे सर्वांचे मते ठरोन महासिंग मुनसी यास आणावा, त्याचे हातून जे करणें ते करावे, असे सरदारांचे सर्वांचे विचारे जाहाले. त्यावरून त्यास आणावयास येथून कृष्णाजी गणेश परकाले व सरदाराचे दोन कारकून पाठविले आहेत. बरोबर जाटाकडील सुखानंदमिश्र होता तोहि गेला आहे. मुख्यार्थ तूर्त दाहालाख रु॥ घ्यावे, पंधरा दोन महिनेयानी साहूकारी निशा द्यावीसी होती तेहि राहून पंधरापैकी दरमाहा पावणेच्यारप्रमाणे त्याणीच द्यावे. साडेसात फालगुन मासी द्यावे; याप्रमाणे कबूल करून दाहा तूर्त द्यावे. पुढे करारप्रमाणे निभावल्यास सलूख; नाही तर सहजेंच बिघाड आहे. दरसालचे अकश लक्ष रु॥ सन ईहिदेपासून पासष्टखेरीज देत जावे असा पहिला करार जाला होता, तोहि आलीकडे पासष्ट ती वर्षांत फिटत तोपर्यंत दरसाल देऊ नये असे जाले तेहि मान्य केले. रणजितसिंगास पंचवीस लक्षांची जागीर द्यावी ते विसाची केली. इतकेहि करून सेवटास जाईलसी दिसत नाही. इतके लांबणीवर पडावयास मामलत न होता आंतरवेदीत आले. गंगा यमुना यास पाणी न आले तोपर्यंत बोलत होते. दोन्ही गंगा भरल्यावर जाबस्वाल लांबणीवर पडिला. गंगापारचे रोहिले पठाण पहिले मुलूक सोडावा, पैका मागो नये, वरकड पाणिपत वगैरे दावे असतील ते माफ करावे असे सूत्र सिंदे याजकडे होते. त्याजवरून येथून सरकारचा येक कारकून नारायणराव मुनसी याचा भाऊ व सिंदे याजकडील बालाराव व होळकराकडील वासुदेव संभाजी गंगापार पाठविले. त्याची भेट जाली. आहंमदखान पठाण फरोकाबादेस आहे, परंतु तिथे येकसूत्र होते. त्यास वकील गेलियावर कोणीकडून चढ बसिला तो न कळे; परंतु चढोनच मुलूक सोडावयाची गोष्ट बद़ले. आम्ही सिपाई मुलूक सोडीत नाहीं, पांच सात लाख रु॥ करार करून मामलत करावी. पुढे मोठे मनसबे करावे. आपण फौजेनसी चाकरीस हाजर आहों. नजीबखानाकड़े मेरठ वगैरे मुलूक आहे तो घेत नाहीं आम्हाजवळच कां मागता ? त्यावरून वकील उठोन आणिले. त्यांची फौजहि आलीकडे आंतरवेदीत आली होती. त्यास आंमदखान फरोकाबादवाला याचे व हफीज रहमतखान व दुंदेखान रोहिले याचा बिघाड जाला. रोहिले यानी फरोकाबादचे दोनच्यार गांव मारिले. फौजहि कांही गंगापार नेली. कांही जागां जागां ठाण्यांतून आहे. तिथे येक जाले होते ते बिघडले त्यावरून अमंदखान याणी आपला विचार करून आपणांकडे माहाल आहेत ते सलुखाने सोडून देऊन स्नेह करावा या विचारे वकील येथे पाठविले आहेत. मुलूक सोडावा असी बातमी आली व गणेश विठ्ठल, बाबुराव हेरि पंचवीस कोस पुढे आहेत त्याजवळहि बोलिले. त्याणी येथे लिहिले.

[१ वावमारे.]

[२ गुप्ते.]

[3712]

वकील पाा. परंतु वकिलाची भेट जालियावर पाहातां मुलूक सुप्रवृत्तीने सोडावासे दिसत नाहीं. येथे आलियावर बिघडले. जो मनसबा योजावा त्यास येकाचा चढ बसतच आहे. सेवटास कसे जाईल पाहावे. सारे रांगडे जाटाचे मामलतीकडे पाहात आहेत. अंतस्ते सारे येक जाले आहेत. इकडे सलुखाचे बोलतच आहेत. अशांत बनल्यास सारे येकत्र होऊन झुंज करावे असाहि मजकूर आहे. यास्तव तूर्त जाटासी सलूख करून अंतरवेद पहिली रोहिले यापासून सोडून घेऊन मग जाटाचे पाठीस लागावे असे योजिले आहे. सेवटास जाईल तेव्हा खरे. गुढगे बहुत आहेत. जाहल्यास पैका थोडाबहुत येऊन पोटास मिळेल. लोकाचे प्रारब्ध पाहावे. नजीबखान समागमे आहेत. सिंदियाचे त्याचे ठीक नाही. होळकर दरोबस्त त्याचे लगामी, तेव्हां हेहि आहेत. आजपर्यंत त्याचाच मनसबा फारसा आइकिला नव्हता. आतां चौकडून सारे मनसबे फसले. कोठे जावयास जागा नाहीं. खर्चास नाही जाणून त्याचे आइकणे प्राप्त जाले. जाटाची मामलत जाल्यास करावी. न होई तर फौज दिलीस उतरून जाटाचे मुलकात धामधूम करावी त्यावरवून सरकारचे आनंदराव गणे (अपूर्ण)

Discussed in (1)