Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 27.215: [25-2-1756] Manaji Paygude reports to Janardanpant the defeat of Bakarullakhan and the subsequent occupation of Kurajahanabad by Govind Ballal.

Selections from the Peshwa Daftar 27.215

Language
Marathi

27.215

पौ छ २९ जाखर

श्री

राजश्री जनार्दनपंत बाबा

गोसावी यासी

छ अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य श्नो मानाजी पायगुडे दंडवत विज्ञापना. येथील कुशल ताा छ २४ राखिरपावेतो मुा कुराजाहानाबाद प्रांत अंतरवेद वर्तमान यथास्थित असे विशेष. बहुत दिवस जाहाले परंतु आपणाकडून पत्र येऊन सेवकाचा सांभाल होत नाही तरी ऐसे नसावे. सदैव पत्र पाठऊन सांभाल करावा. कुराजाहानाबाद येथील सुभा दूर करून श्रीमंत राजश्री दादासाहेब याणी पातशाहाची सनद घेऊन गोविंद बलाल याजकडे मामलत सांगितली. बकरुलाखान याणे सनद न मानून सवा महिनापर्यंत युध्य केले. राजश्री गंगाधर बाजीराव याजकडील व आम्हाकडील पथक व गोविंदपंत ऐसे मिळोन युध्य करून आविंधाची फौज बुडविली. माघ शुध्द त्रयोदशीस जरारा तोफखाना सोडून गंगापार पलोन गेला. युध्याचा सविस्तर अर्थ श्रीमंतांचे पत्री लिहिला आहे त्याजवरून कळेल. बहुत काय लिहिणे कृपालोभ असो दीजे हे विनंती.

[+ जमादिलावल असावें कारण युद्ध माघ शुद्ध त्रयोदशीस झालें त्यानंतर पत्र लिहिलें गेलें.]